एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘देवमाणूस’ मधील अजितकुमार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला? किरण गायकवाड नव्या भूमिकेत…

भैय्यासाहेब नंतर डॉ. अजितकुमार आता दिसणार फौजीच्या भूमिकेत अभिनेता किरण गायकवाड?

१५ ऑगस्ट ला ‘देवमाणूस’ ही मालिका संपली आणि प्रेक्षकांनी लगेचच यातल्या कलाकरांना मिस करायला सुरुवात केली. प्रेक्षकांनी झी मराठी वाहिनी वरील ‘देवमाणूस’ मालिकेला प्रचंड प्रेम दिले आहे. यातल्या व्यक्तिरेखा आणि त्या व्यक्तिरेखा साकारणारे कलाकार प्रेक्षकांचे फारच लाडके बनले होते. मालिका संपणार असल्याची बातमी मिळताच प्रेक्षकांना खूप वाईट वाटले होते.

‘देवमाणूस’ मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या किरण गायकवाड या अभिनेत्याबद्दल प्रेक्षकांना विशेष प्रेम होते. त्याच्या खलनायकी व्यक्तिरेखेला म्हणजेच डॉ. अजितकुमार उर्फ देवीसिंग या व्यक्तिरेखेला लोकांनी कितीही नावे ठेवली तरी ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यावर म्हणजेच किरण गायकवाड वर प्रेक्षकांनी नेहमीच प्रेम केले आहे.

त्याने उत्तम अभिनय केल्याने प्रेक्षकांना त्याच्या या खलनायकी भूमिकेचा राग येऊ लागला होता. आपल्या या अभिनयाची झलक दाखवण्यासाठी पुन्हा किरण गायकवाड एका नव्या प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

त्याच्या ‘देवमाणूस’मधील भूमिकेबाबत किरणने एक किस्सा शेअर केला होता. त्याच्या आईला त्याची ‘देवमाणूस’ मधील भूमिका अजिबात आवडली नव्हती. त्याने कारण विचारले असता त्याच्या आईने सांगितले, की त्यांच्या मैत्रिणी आता त्यांच्याशी बोलत देखील नाहीत. त्यांनी किरणच्या आईला सांगितले, की तुझ्या मुलाला थोडे चांगले काम करायला सांग. त्यावर किरणने उत्तर दिले, की माझा मालिकेत लोक तिरस्कार करतात हा अभिनेता म्हणून माझा विजय आहे.

असा हा गुणी अभिनेता पुन्हा प्रेक्षकांना भेटण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘देवमाणूस’ च्या आधी किरणला आपण ‘लागीरं झालं जी’ या मालिकेत भैय्यासाहेबांची भूमिका केली होती. खलनायकाची भूमिका असली तरी देखील या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. आता एका नव्या प्रोजेक्ट मधून किरण गायकवाड प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून त्याने याची माहिती दिली/

किरणने सोशल मीडिया वर एक फोटो शेअर करत ‘काहीतरी नवीन’ अशी कॅप्शन त्याला दिली आहे. या फोटोत एक डोंगर दिसत असून किरण त्या डोंगराकडे तोंड करून उभा आहे. कॅमेऱ्याकडे पाठ केलेली असल्याने त्याचा चेहरा दिसत नाहीये. मात्र यातल्या त्याच्या पेहरावाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यात तो एका जवानाच्या पेहरावात आहे. त्यामुळे किरणची नवी भूमिका ही फौजीची असणार आहे, असा अंदाज चाहते लावत आहेत.

You might also like