एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

पोलिसांनी त्रा’स दिला पण तरीही IPS व्हायचं ठरवलं! भारताच्या ‘आयर्नमॅन’ ची कथा…

बारावीत शिक्षण घेत असलेला एक हुशार मुलगा. वडील DySP. परीक्षेला दोन महिने उरले असताना या मुलाने शेजारी चालू असलेल्या एका अ’वै’ध बांधकामाचा विरोध केला. काही दिवसांनी पो’ली’स येऊन त्या मुलाला क्रिकेटच्या मैदानावरून घेऊन गेले. पोलीस स्टेशनला नेऊन त्याला बराच त्रा’स दिला.

त्याच्या बहिणीने वडिलांना फोन करून बोलवून घेतलं. वडिलांनी मुलाला घरी आणले. मुलगा भ’यं’कर चिडला होता. मात्र वडिलांनी त्याला समजावलं आणि गावी पाठवलं. वर्षभर शेती केल्यानंतर त्या मुलाने या घटनेचा आयपीएस (IPS) बनून सूड उगवायचं ठरवलं. आज तो मुलगा पुण्याच्या पिंपरी-चिंचवड विभागाचा पोलीस आयुक्त म्हणून काम पाहतो आहे.

मित्रांनो, ही कोणत्याही दाक्षिणात्य चित्रपटाची कथा नाहीये. ही आहे सत्य घटना आणि या घटनेतला मुलगा आहे आयपीएस कृष्ण प्रकाश. झारखंडच्या हजारीबागमधल्या कोरंबाई या छोट्याशा गावात कृष्ण प्रकाश यांचा जन्म झाला. सुरुवातीचे शिक्षण गावातल्या साधारण शाळेतच झाले.

पुढे हजारीबागला प्रवेश घेतला. पदवी संपादन केली. आयुष्यात घडलेल्या घटनेमुळे UPSC करायचं ठरवलं. कॉलेज करत करत एकीकडे सामाजिक कार्यही सुरू होतंच. दरम्यान एका स्थानिक वर्तमानपत्राबरोबर देखील काम केलं.

UPSC परीक्षेच्या मुलाखतीत दोन वेळा अ’प’यश आलं. पण खचून न जाता पुन्हा मुलाखत दिली. यावेळी मात्र ते यशस्वी झाले. २९५ पैकी १७८ गुण मिळवून ते पास झाले आणि १९९८ बॅचचे आयपीएस अधिकारी बनले. सध्या ते पुण्याच्या पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून काम बघत आहेत.

कृष्ण प्रकाश यांनी महाराष्ट्रात आतापर्यंत गडचिरोली, नांदेड, बुलढाणा, मालेगाव, अमरावती, नगर आणि दक्षिण मुंबई मध्ये काम पाहिले आहे. त्यांचे पोस्टींग कुठेही असले तरी नि’र्दो’ष व्यक्तीला त्रा’स होणार नाही या एका गोष्टीची ते विशेष काळजी घेतात. असा जर कुणी नि’र’प’राध व्यक्तीला त्रा’स द्यायचा प्रयत्न केला तर त्याला ते शि’क्षा करतात.

कृष्ण प्रकाश यांचा विवाह त्यांच्या वडिलांच्या मित्राच्या मुलीशी झाला आहे. त्यांच्या पत्नीचे नाव संजना आहे. वडिलांनी लहानपणीच या दोघांचे लग्न करायचे असे मनावर घेतले होते. त्याप्रमाणे ते झाले देखील.

कृष्ण प्रकाश एक चांगले वक्ते आणि लेखकही आहेत. कृष्ण प्रकाश यांनी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलं आहे. त्यांना भारताचा ‘आयर्नमॅन’ म्हणून देखील ओळखले जाते.

कृष्ण प्रकाश यांनी २०१७ मध्ये ‘आयर्नमॅन ट्रायथलॉन’ हा जगातील आव्हानात्मक एक दिवसीय खेळ प्रकार पूर्ण केला. या खेळ प्रकारात तीन प्रकारच्या स्पर्धांना स्पर्धकाला तोंड द्यावे लागते. यामध्ये ३.८६ किमी पोहणे, १८०.२५ किमी सायकलींग करणे आणि ४२.२० किमी पळणे हे प्रकार समाविष्ट आहेत.

हे तिन्ही प्रकार केवळ १६ ते १७ तासांमध्ये पूर्ण करायचे असतात. कृष्ण प्रकाश आपल्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी ही स्पर्धा पूर्ण केलीच पण त्याचवेळी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपल्या नावाची नोंदही केली. ही स्पर्धा पूर्ण करणारे ते पहिले भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत.

त्यासाठीच त्यांचे नाव गिनीज बुक मध्ये नोंदवण्यात आलं आहे. ‘आयर्नमॅन ट्रायथलॉन’ स्पर्धा वेळेत पूर्ण करणाऱ्याला ‘आयर्नमॅन’ ही पदवी दिली जाते. म्हणूनच कृष्ण प्रकाश भारताचे आयर्नमॅन म्हणून प्रसिद्ध आहेत.

You might also like