एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

WWE मधील ग्रेट खली यांची पत्नी आहे खूपच हॉ’ट, सौंदर्याच्या बाबतीत देते..

मित्रानो तुम्हाला World Wrestling Entertainment म्हणजेच WWE पाहण्यास आवडते तर हा लेख तुमच्यासाठी आहे, तुम्हाला प्रसिद्ध भारतीय आणि अमेरिकन पैलवान द ग्रेट खली माहीत असेलच, खली एक असा पैलवान होता ज्याने WWE मध्ये आपल्या पेक्षा उत्तम पैलवानाला देखील तारे दाखवले होते. खली त्यांच्या हाईट आणि ताकदी साठी ओळखले जातात.

खली एक प्रोफेशनल पैलवान सोबत एक बॉलिवूड मधील अभिनेता सुद्धा आहे, खलीने आत्तापर्यंत ४ हॉलिवूड फिल्म आणि २ बॉलिवूड फिल्ममध्ये काम केले आहे. याचबरोबर ते काही टीव्ही सिरीयल मध्ये सुद्धा दिसले होते या यशाच्या उंचावर पोहचताना त्यांना भरपूर संघर्ष करावा लागला आहे.

द ग्रेट खली या नावाने प्रसिद्ध असलेला पैलवान यांचा जन्म २७ ऑगस्ट १९७२ मध्ये हिमाचल प्रदेश मधील धिरियाना ग्राम मध्ये पंजाबी कुटूंबियात झाला होता. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की खली यांचे खरे नाव दिलीप सिंह राणा आहे.

खलीच्या वडिलांचे नाव ज्वालाराम आहे. खलीच्या आईचे नाव तांडी देवी आहे. खलीला ७ भावंडे देखील आहेत. खलीच्या भावंडांचे शरीर सामान्य आहे, पण खली लहानपणापासूनच खूप निरोगी आणि उंच होता.

खलीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नव्हती. त्याचे वडील शेतकरी होते आणि तेच कुटुंबासाठी काम करत होते. गरिबीमुळे खलीला शिक्षण घेता आले नाही. कुटुंबाला मदत करण्यासाठी, खलीने लहान वयातच काम सुरू केले. परंतु गावात काम केल्यामुळे खलीला खूप कमी पैसे मिळत होते त्याने अशा परिस्थितीत तो शहरात काम करण्यासाठी निघून गेला.

१९९३ मध्ये खलीचे आयुष्य बदलले. खरं तर या वर्षी खली पंजाब पोलिसात एएसआई (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक) पदासाठी पात्र झाला आणि त्याने पंजाब पोलिसात काम करण्यास सुरवात केली. जेव्हा त्याला पंजाब पोलिसात नोकरी मिळाली, तेव्हा खलीची आर्थिक स्थिती सुधारली आणि त्याने पूर्वीपेक्षा त्याच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे सुरू केले.

दरम्यान, खलीने वर्ष १९९५ मध्ये आणि १९९६ मध्ये मिस्टर इंडिया बॉडी बिल्डिंगचे विजेतेपद पटकावले. त्यावेळी एक दिवस खलीचा मित्र अमित स्वामी खलीला दिल्लीच्या इंडिया गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेऊन गेला.

येथे खली पहिल्यांदा त्याची आवडती कुस्तीपटू डोरियन येट्सला भेटला. खलीच्या उंची-आरोग्यामुळे येट्स देखील प्रभावित झाले. त्याने खलीला कुस्तीच्या जगात आपले नशीब आजमावण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मग पुढे जाऊन खली पैलवान बनला.

पण खलीच्या बायको बद्दल कोणाला माहीत आहे का ? तर आता आम्ही तिच्याबद्दल बोलणार आहोत, खली यांनी २००२ मध्ये जालंधरमधील नूर महल येथे राहणारी थर्मेंद्र खोरशी लग्न केले. दोघांना एक मुलगी आहे जीच नाव त्यांनी अभलिंग राणा असे ठेवले आहे.

थर्मेंद्र म्हणते की मी माझ्या मुलींला त्यांच्या वडीलांनप्रमाणे खेळाडू बनवेल. थर्मेंद्र हाऊसवाईफ आहे त्यामुळे ती घरी राहून आपल्या मुलीला सांभाळते. ती दिसायला सुद्धा खूपच आकर्षक आहे.

You might also like