एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘केजीएफ’ फेम अभिनेता यशने खरेदी केले नवे घर! पत्नी राधिकासोबत केली पूजा, किंमत आहे एवढी..

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेते प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच यश हा अभिनेता. यश दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध कलाकार आहे. त्याचा प्रत्येक चित्रपट हिट होतो. आजपर्यंत त्याने जवळपास २० चित्रपटांमध्ये काम केले आहे. आश्चर्याची बाब ही आहे की त्याचे सगळेच चित्रपट खूप हिट ठरले आहेत. २०१८ ला प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ’ चित्रपटाने त्याला देशभर प्रसिद्धी मिळवून दिली.

दक्षिण भारतात यशचे अनेक चाहते आहेत. ‘केजीएफ’ च्या यशानंतर त्याचे फॅन फॉलोविंग आता देशभर पसरले आहे. यश कन्नड फिल्म इंडस्ट्री मधला सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. आता त्याचे फॅन्स ‘केजीएफ २’ ची वाट पहात आहेत. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वी यशने अनेक कन्नड मालिकांमध्ये कामे केली आहेत. बऱ्याच जणांना त्याच्याबद्दल एक गोष्ट ठाऊक नाहीये आणि ती म्हणजे त्याचे नाव. यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा आहे.

Third party image reference

यशचे चित्रपट, त्याचा चित्रपटातला लूक आणि व्यक्तिरेखा यावर त्याचे फॅन्स नेहमीच चर्चा करत असतात. सध्या मात्र तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. सध्या त्याच्या नव्या घराचे फोटो सोशल मीडिया वर व्हायरल होत आहेत. यशने नवीन घर घेतले असून त्याच्या पूजेच्या वेळचे हे फोटो आहेत. या फोटोंमध्ये आपण त्याचे आलिशान घर पाहू शकतो. या फोटोंमध्ये यश आपली पत्नी राधिका आणि आपल्या परिवाराबरोबर पूजा करताना दिसत आहे. या नवीन घराचे फोटो चाहत्यांना खूपच आवडले असून त्यांनी यशला नवीन घरासाठी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Third party image reference

यश आपल्या चित्रपटांसाठी खूप मोठी रक्कम आकारतो. यशकडे जवळपास ५० कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे माध्यमातील वृत्तांमधून कळते. बंगळुरूमध्ये देखील यशचा अजून एक बंगला असून त्याची किंमत जवळपास ४ कोटी आहे. यशला गाड्यांची देखील खूप आवड आहे. यशकडे ऑडी क्यू ७ आणि रेंज रोव्हर सारख्या गाड्या आहेत.

Third party image reference

२०१६ मध्ये यशने कन्नड अभिनेत्री राधिकाशी लग्न केले होते. या दोघांना दोन मुले असून मुलीचे नाव आर्या तर मुलाचे नाव यथर्व आहे. यशची आई एक हाऊसवाईफ आहे. यशच्या वडीलांनी खूप कष्टाने यशला वाढवले आहे. यशचे वडील अरुण कुमार जे. एक बस ड्रायव्हर आहेत. यश जरी एक स्टार सेलिब्रेटी असला तरी त्याचे वडील आजही ड्रायव्हर म्हणून काम करतात. हे काम न सोडण्याबद्दल ते म्हणतात की याच कामामुळे त्यांचा मुलगा आज मोठा झाला आहे.

Third party image reference

You might also like