एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ परीक्षक कार्तिकी गायकवाड झालीये खूष; काय आहे नक्की ‘गुडन्यूज’? पहा..

झी मराठी वरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ म्हणजे छोट्या गंधर्वांना गाताना पाहण्याचा अपूर्व सोहळा. त्यांच्या बालगळ्यातून गगनाला गवसणी घालणाऱ्या ताना ऐकल्या की कान तृप्त होऊन जातात.

झी मराठी ने जेव्हा पहिल्यांदा ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ चा रूपाने लहान मुलांची गाण्याची स्पर्धा सुरू केली, तेव्हा हा कार्यक्रम बराच गाजला होता. २००६ ला हा कार्यक्रम सुरू झाला होता. या कार्यक्रमाने महाराष्ट्राला पाच अमूल्य गानरत्नं दिली. पंचरत्नं म्हणून आज सगळं महाराष्ट्र त्यांना ओळखतो.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kartiki Kalyanji Gaikwad Pise (@kartiki_kalyanji_gaikwad9)

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ चे हे पहिले पर्व जिंकले होते कार्तिकी गायकवाड या गायिकेने. आपल्या खड्या पण गोड आवाजाने तिने सगळ्यांची मने जिंकून घेतली. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ च्या तिसऱ्या पर्वात आपण तिला परत पहात आहोत. पण यावेळी ती स्पर्धक म्हणून नाही, तर परीक्षक म्हणून आपल्या भेटीला आली आहे.

कधीकाळी आपण जिला स्पर्धक म्हणून ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ च्या स्टेज वर गाताना पाहिलं होतं, त्या कार्तिकीला आज त्याच मंचावर गाणाऱ्या लहान मुलांना मार्गदर्शन करताना पाहून प्रेक्षकांना खूप आनंद होत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kartiki Kalyanji Gaikwad Pise (@kartiki_kalyanji_gaikwad9)

अशी ही छोटी कार्तिकी बघता बघता मोठी झाली आणि तिने २०२० मध्ये रोनित पिसे बरोबर लग्नगाठ बांधली. आता ती एक गुड न्यूज देणार आहे. अहो, थांबा थांबा! ही गुड न्यूज म्हणजे काही ‘कुणीतरी येणार येणार गं… पाहुणा घरी येणार येणार गं…’ ची गुड न्यूज नाहीये.

ही गुड न्यूज आहे कार्तिकीच्या नव्या पाहुण्यांच्या आगमनाची. हे नवे पाहुणे आहेत तिचे सोशल मीडिया वरचे फॉलोवर्स. नुकताच कार्तिकीने सोशल मीडिया वर एक लाख फॉलोवर्स चा टप्पा पार केला.

आपल्या या नव्या फॉलोवर्स मुळे कार्तिकी गायकवाड फार खूष झाली आहे. तिने आपल्या फॉलोवर्स चे आभारही मानले आहेत. ती म्हणाली, की माझ्या चाहत्यांचे अतिशय मनापासून मी आभार मानते. एखाद्या कलाकाराला चाहत्यांचे प्रेम मिळणं ही सर्वांत मोठी कौतुकाची थाप असते.

आजकाल हे कौतुक केवळ शब्दांपुरतं मर्यादित राहिलं नाहीये. चाहते वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या आवडत्या कलाकाराला प्रोत्साहन देत असतात आणि त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक करत असतात. सोशल मीडिया हे सध्याचे सर्वांत प्रभावी माध्यम आहे.

काय मग मंडळी, कशी वाटली कार्तिकी गायकवाडची गुड न्यूज? तुमच्या आवडत्या कलाकारांसंबंधी अशाच काही गुड न्यूज मिळवण्यासाठी आमचे लेख वाचत चला, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.

You might also like