एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘सबकी पसंद निरमा…’ एक बाप ज्याने आपल्या मृ’त मुलीला अजरामर केले!

“निमा, रेखा, जया और सुषमा..सबकी पसंद निरमा” काय मंडळी, तुम्ही पण हे अगदी ताला-सुरात म्हटलं असेल ना? अहो ही जाहिरातच अशी होती जी सगळ्यांच्या मनामनांत घर करून बसली आहे. भारतातल्या जवळपास सगळ्या घरांनी निरमा वॉशिंग पावडर एकदा तरी वापरली असणारच आहे. पण तुम्हाला माहीत आहे का हे प्रसिद्ध ‘निरमा’ नाव कुठून आलं? काय आहे नक्की या नावामागचा इतिहास?

निरमा कंपनीचे मालक करसनभाई पटेल मूळचे गुजरातच्या मेहसाणा गावचे. त्यांचे वडील खोडीदास पटेल एक अत्यंत साधारण व्यक्तिमत्व. मात्र त्यांनी आपल्या मुलाला रसायनशास्त्रात पदवीधर बनवलं. इतर लोकांप्रमाणेच करसनभाईंना आपला व्यवसाय करायचा होता. पण घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी एका लॅबमध्ये असिस्टंट म्हणून नोकरी करायला सुरुवात केली. त्यांना पुढे एका सरकारी खात्यात नोकरी लागली.

दरम्यान एक अत्यंत वा’ईट घटना घडली. करसनभाई यांची लाडकी मुलगी निरुपमाचे अकाली नि’ध’न झाले. निरुपमाला लोक लाडाने ‘निरमा’ म्हणून हाक मारत. आपली मुलगी आपले स्वप्न पूर्ण करेल, आपलं नाव मोठं करेल अशी आशा असताना तिचं असं अचानक जाणं करसनभाईंच्या मनाला लागलं.

आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी १९६९ मध्ये त्यांनी ‘निरमा’ कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या स्थापनेने त्यांनी आपले स्वतःच्या व्यवसायाचे स्वप्न तर पूर्ण केलेच, पण त्याचबरोबर आपल्या मुलीलादेखील अजरामर बनवले.

त्यांनी आधी घरगुती स्तरावर निरमा वॉशिंग पावडरचे उत्पादन करायला सुरुवात केली. आजकालसारखा जाहिरातींचा काळ नव्हता तो. सायकलवरून घरोघरी जाऊन करसनभाई आपले हे उत्पादन विकू लागले. त्यावेळी बाजारात हिंदुस्तान लिव्हरची ‘सर्फ’ ही कपडे धुण्याची पावडर बाजारात उपलब्ध होती.

मात्र त्याची किंमत त्यावेळी १३ रुपये होती जी सामान्य माणसाला परवडणारी नव्हती. मग साध्या साबणाने कपडे धुतले जायचे पण त्याने हात खराब होत होते. तुलनेने निरमा वॉशिंग पावडर केवळ ३.५० रुपये किलो होती. त्याने हाताला देखील त्रा’स होत नसे.

लवकरच या पावडरची मागणी वाढली. नोकरी आणि व्यवसाय सांभाळणे कठीण होत चालले तसे करसनभाईंनी नोकरी सोडून व्यवसायावर लक्ष केंद्रीत केले. त्याकाळी नोकरी सोडून व्यवसाय करणे सोपी गोष्ट नव्हती. जेव्हा जाहिरात करणे फक्त वर्तमानपत्र आणि रेडिओपुरते मर्यादित होते, त्यावेळी करसनभाईंनी टीव्हीवर जाहिरात दिली.

“निरमा, निरमा, वॉशिंग पावडर निरमा…” अशा शब्दांनी सुरुवात करत या जाहिरातीने आबालवृद्धांच्या मनात स्थान मिळवलं आणि निरमा पावडर “सबकी पसंद निरमा” बनली.

You might also like