एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘बादशाह’ चित्रपटातील या चिमुरडीला ओळखले का? आता झाले खूप मोठी, दिसते खूपच बोल्ड, पहा..

सध्या चित्रपटसृष्टीत अनेक बड्या कलाकारांची मुले आपले नशीब आजमावताना दिसत आहेत. काही अशी स्टार मंडळींची मुले आहेत, तर काही आहेत बालकलाकार म्हणून प्रसिद्ध झालेले चेहरे.

लहानपणी बालकलाकार म्हणून काम केल्यावर मोठेपणी सुद्धा असे कलाकार पुनः आपले नशीब आजमावण्यासाठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवतात. काही यशस्वी होतात, तर काहींची लहानपणीची जादू नंतर मात्र चालत नाही.

या बालकलाकारांमध्ये काही मुले मात्र अशीही असतात की त्या एका भूमिकेनंतर ती चित्रपटसृष्टीतून दिसेनाशीच होतात. अर्थात प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असू शकतात. अशाच बालकलाकारांमध्ये एक आहे करिष्मा जैन.

नावावरून कदाचित तुम्हाला ती आठवणार नाही. पण जर तुम्ही शाहरुख खानचा ‘बादशाह’ चित्रपट बघितला असेल, तर ही चिमुरडी तुमच्या लगेच लक्षात येईल.

चित्रपटात अतिशय खोडकर असलेली आणि टॉमबॉय दिसणारी हि मुलगी आता मात्र बरीच मोठी झाली आहे. म्हणजे किती मोठी? तब्बल २८ वर्षांची. जसजसे वय वाढत गेले आहे, तसतसा तिच्यात बराच बदल झालेला आपल्याला दिसून येतो.

सध्या तिचे मोठेपणीचे फोटो सोशल मीडिया वर व्हायरल होत आहेत. या फोटो मध्ये ती पूर्वीपेक्षाही खूप सुंदर दिसते आहे. तिच्या वेगवेगळ्या फोटोंवर अनेक लाईक्स आणि कमेंट्स चा वर्षाव होताना दिसतो.

‘बादशाह’ चित्रपटानंतर मात्र ही चिमुरडी एकाही चित्रपटात दिसली नाही. २०१५ मध्ये तिने अभिषेक छाजेड सोबत लग्न केले आणि सेटल झाली. का बरं आपल्याला ती कोणत्याच चित्रपटात दिसली नाही? कारण तिला अभिनयाची आवड नाही.

या क्षेत्राची आवड नसल्याने तिने पुन्हा कोणत्याच चित्रपटात काम केले नाही. ती सहसा प्रकाशझोतात येत नाही. बॉलिवूड पार्ट्या किंवा पुरस्कार सोहळ्यांनाही हजेरी लावत नाही. त्यामुळे लोकांना तिच्याबद्दल फारशी माहिती नाही.

अभिनय क्षेत्राशी ओळख झालेली प्रत्येक व्यक्ती या क्षेत्रातच करिअर करेल असे काही नाही. हेही तितकंच खरं आहे, की या क्षेत्रात येणाऱ्या व्यक्तीला परत बाहेर पडावंसं वाटत नाही. मात्र सगळ्यांनाच या चंदेरी दुनियेची स्वप्नं पडत नाहीत.

प्रत्येकजणच या चंदेरी दुनियेत रमत नाही. काहींची स्वप्नं वेगळी असतात. मग काय मंडळी, तुमचं स्वप्न काय आहे? आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. चंदेरी विश्वातल्या अशाच काही गोष्टी जाणून घेण्यासाठी आमचे लेख नियमितपणे वाचत चला. तसेच आमचे लेख शेअर करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like