एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सर्वत्र होतेय करिनाच्या तिसऱ्या मुलाची चर्चा, स्वतः करिनाने दाखिवली आपल्या तिसऱ्या मुलाची झलक..पहा

करिना कपूरने २१ फेब्रुवारी २०२१ ला आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. करिना याबाबत खूप खूष असून तिच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. अशातच तिने आपल्या तिसऱ्या अपत्याची घोषणा करताच सर्वांनाच ध’क्का बसला आहे. नक्की कोण आहे हे तिसरे अपत्य आणि करिनाचे यावर नक्की म्हणणे काय आहे?

करिना नेहमी सोशल मीडिया वर सक्रिय असते. आपल्या खाजगी आणि कामाच्या बाबतीतल्या गोष्टी ती आपल्या चाहत्यांशी शेअर करत असते. करिनाने सोशल मीडिया वर एक व्हिडिओ शेअर करत ही बातमी दिली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

या व्हिडिओ मध्ये तिने खरं तर आपल्या पुस्तकाची घोषणा केली आहे. या पुस्तकालाच ती आपले तिसरे अपत्य म्हणते. ‘करिना कपूर खानस् प्रेग्नन्सी बायबल’ असे या पुस्तकाचे नाव आहे.

या पुस्तकामध्ये तिने आपल्या दोन्ही प्रेग्नन्सीचे अनुभव नमूद केले आहेत. आपल्या या पोस्ट च्या कॅप्शन मध्ये ती म्हणते, “माझ्या दोन्ही प्रेग्नन्सी आणि त्यावरचे हे पुस्तक, हा सगळा माझ्यासाठी एक प्रवास होता. काही खूप छान दिवस होते, तर कधी कधी वाईट दिवसही अनुभवले.

कधी कधी कामावर जायचा प्रचंड उत्साह असायचा, तर कधी बेडवरून उठणं देखील जिवावर यायचं. माझ्या प्रेग्नन्सीच्या दिवसात मी कोणकोणत्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेतून गेले आहे याचे अनुभव या पुस्तकात नमूद केले आहेत.”

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

तिच्या या पुस्तकाला भारतीय स्त्रीरोग तज्ञ आणि प्रसूतिशास्त्रज्ञांच्या अधिकृत संस्थेकडून म्हणजेच FOGSI कडून मान्यता मिळाली आहे. हे पुस्तक लिहिण्यामध्ये करिनाच्या वैयक्तिक डॉक्टरांचेही खूप योगदान आहे. “या पुस्तकाबद्दल तुमच्याशी शेअर करताना मी उत्सुकही आहे आणि थोडीशी नर्व्हसही आहे”, असेही करिनाने आपल्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे.

या पुस्तकात करिनाने वैयक्तिक अनुभव आणि तज्ज्ञांचे मत समाविष्ट केले आहेत. इतर ग’रोदर महिलांनाही या पुस्तकाचा फायदा होईल असे तिला वाटते. चाहत्यांनी तिच्या या पोस्टला भरभरून लाईक करत कमेंट्स मधून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

सध्या करिना आपल्या मुलाच्या येण्याने बिझी आणि आनंदात असली तरी लवकरच आपल्याला ती नवीन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. लवकरच ती आमिर खान सोबत ‘लाल सिंग चड्ढा’ मध्ये दिसेल. याशिवाय करण जोहरच्या ‘तख्त’ चित्रपटातही ती काम करणार आहे. करिनाची पडद्यावर पुन्हा एंट्री आणि तिचे नवीन पुस्तक या दोन्हींची तिचे चाहते अगदी उत्सुकतेने वाट पहात आहेत.

You might also like