एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

करीना आणि सैफ ची प्रेमकहाणी! असे जुळले या दोघांचे सूत? पळून जाण्याचा केला होता प्लॅन..

बॉलिवूडच्या टॉप सेलिब्रेटी कपल मध्ये नाव घेतलं जातं ते करीना कपूर आणि सैफ अली खान या दोघांचं. तशी या दोघांची जोडी बॉलिवूडमध्ये आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये देखील खूप प्रसिद्ध आहे.

अशा या जोडीच्या प्रेमकहाणी बद्दल आज जाणून घेऊया. या दोघांमध्ये जवळपास दहा वर्षांचे अंतर आहे. तरीदेखील हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रेमाला वयाचे बंधन नसते हे सिद्ध करणारी जोडी म्हणजे सैफ आणि करीना उर्फ सैफीना.

एकाच इंडस्ट्री मध्ये असल्याने सैफ आणि करीना एकमेकांना ओळखत होते. या दोघांनी ‘एलओसी कारगिल’ आणि ‘ओंकारा’ चित्रपटात एकत्र कामही केले होते. मात्र यांच्या मनाच्या तारा जुळल्या त्या २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टशन’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान.

या चित्रपटाची बॉक्स ऑफिस वर फार काही जादू चालू शकली नाही, मात्र करीना आणि सैफ मध्ये जवळीक वाढण्याची जादू मात्र घडून आली. करीनाने नंतर एका मुलाखतीदरम्यान सांगितले, की “आम्ही त्या आधीही भेटलो होतो. मात्र टशन चित्रपटाच्या शूटींगच्या वेळी काहीतरी वेगळेच घडले. सैफ खूपच चार्मिंग आहे. मी लगेचच त्याच्या प्रेमात पडले.”

 

सैफने याआधी १९९१ मध्ये अभिनेत्री अमृता सिंग बरोबर लग्न केले होते. या दोघांना सारा आणि इब्राहीम अशी दोन मुले देखील आहेत. २००४ मध्ये मात्र हे दोघे वेगळे झाले. करीना देखील सैफ शी लग्न करण्याआधी अभिनेता शाहीद कपूर बरोबर रिले’श’नशिपमध्ये होती.

पुढे या दोघांचेही ब्रे’क’अप झाले. सैफ आणि करीनाने एकमेकांना डे’ट करायला सुरुवात केली तेव्हा या दोघांनीही आपले नाते लपवायचा बराच प्रयत्न केला होता. मात्र सैफने २००८ मध्येच आपल्या हातावर ‘करीना’ असा टॅटू काढून घेतल्याने त्यांची रिलेशनशिप जगजाहीर झाली.

मात्र त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. घरच्यांचा विरोध झाल्याने करीना आणि सैफ प’ळून जाऊन लग्न करणार होते. सैफ दोन मुलांचा पिता आहे, तसेच करीनापेक्षा तो वयाने खूपच मोठा आहे या कारणांमुळे करीनाच्या घरून यांच्या लग्नाला विरो’ध होता. मात्र पुढे सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या आणि दोघेही पुढे २०१२ मध्ये लग्नबंधनात अडकले.

२०१६ ला त्यांच्या पहिल्या मुलाचा म्हणजेच तैमूरचा जन्म झाला. करीनाने २०२१ मध्ये आपल्या दुसऱ्या मुलाला – जेह ला जन्म दिला. दोन मुलांच्या जन्मानंतरही सैफ आणि करीनामधील प्रेम दिवसेंदिवस बहरतच चालले आहे.

You might also like