एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

करीनाने केली बाप्पाची पूजा! तैमूरने हाताने साकारली बाप्पाची मूर्ती…

गणपती बाप्पाचे आगमन होताच सगळीकडे लगबगीचे वातावरण सुरू होते. यंदा मात्र गेल्या वर्षीप्रमाणेच गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत असल्याचे चित्र आहे. सगळ्यांच्याच घरी बाप्पांनी आगमन केले आहे. सेलिब्रेटींच्या घरातसुद्धा बाप्पा विराजमान झालेले दिसून येत आहेत. अनेक सेलिब्रेटींनी सालाबादप्रमाणे यंदाही गणेशाची स्थापना केली आहे. त्यांच्या घरच्या गणपती बाप्पाचे फोटो त्यांनी सोशल मीडिया वर पोस्ट केले आहेत. अर्थातच ते सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहेत.

Source: insta/kareenakapoorkhan

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरच्या घरी देखील गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. मोठ्या उत्साहात तिने बाप्पाची स्थापना केलेली पाहायला मिळते आहे. तिच्या घरच्या बाप्पाचे फोटो सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहेत. सध्या करीना आपल्या दुसऱ्या मुलाच्या म्हणजे जेह उर्फ जहांगिर च्या आगमनात व्यस्त असलेली पाहायला मिळते. त्यातून वेळ काढत तिने यंदा बाप्पांचे स्वागत केले आहे.

Source: insta/kareenakapoorkhan

तिने काही फोटो शेअर केले आहेत. गणेशाची छोटीशी सुबक मूर्ती टेबलवर विराजमान झालेली या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये करीना बरोबर तिचा पती अभिनेता सैफ अली खान आणि छोटे नवाब म्हणजेच जहांगिरचा मोठा भाऊ तैमूर देखील दिसत आहेत. तिघांनीही पांढरे कुर्ते घातले असून बाप्पासमोर नमस्कार करताना दिसत आहेत. करीना तैमूरला पूजा करताना शिकवत असल्याचेही या फोटोत दिसून येते.

विशेष म्हणजे यंदा तैमूरने आपल्या हाताने बाप्पा साकारला आहे. त्याने चिकणमातीपासून बाप्पा तयार केले आहेत. करीनाने खूप कौतुकाने या छोट्या नवाबाची ही कला कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहे. त्याचे फोटो देखील तिने सोशल मीडिया वर शेअर केले आहेत. आपल्या बालबुद्धीला पटतील असे मस्त रंगसंगती करत तैमूरने आपला बाप्पा साकारला आहे.

करीना तैमूरचे इतरही फोटो नेहमी शेअर करत असते. तैमूर आपल्या दोस्त कंपनीबरोबर खूपच मस्ती करत असतो. त्याचेही फोटो करीना आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर टाकत असते. करीना सगळेच सण आपल्या कुटुंबाबरोबर साजरे करत असते. आपले आई, वडील आणि बहीण करिष्मा बरोबर वेळ घालवत ती आपले सण साजरे करत असते. त्यांच्याबरोबरचेही फोटो ती सोशल मीडिया वर पोस्ट करताना दिसते.

तर मंडळी, तुम्हाला छोट्या तैमूरचा छोटुसा गणपती बाप्पा कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा.

You might also like