एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

रस्त्यावर पेन विकणारा जेव्हा करोडपती होतो! जाणून घ्या जॉनी लीवर यांचा थक्क करणारा प्रवास..

कधी घर चालविण्यासाठी विकायचा मुंबईच्या रस्त्यावर पेन, प्रतिभेच्या जोरावर आज आहे इतक्या कोटींच्या मालमत्तेचा मालक..

टॅलेंट आणि मेहनत करायची तयारी असेल तर पैसा आणि प्रसिद्धी तुमच्याकडे चालत येते असं म्हणतात. हिंदी चित्रपटांमध्ये पोट धरून हसायला लावणारे अभिनेते जॉनी लिव्हर यांच्याबाबतीतही असंच झालं. मूळचे गोव्याचे असलेले जॉनी मुंबईत लहानाचे मोठे झाले. घरच्या गरीबीमुळे त्यांना अनेक प्रकारची कामे करावी लागली. मात्र लवकरच त्यांचे दिवस पालटले आणि गरिबाघरचा हा मुलगा स्वतःच्या विनोदबुद्धीने नावारूपाला आला.

जवळपास चार दशके चित्रपटसृष्टीत विनोदी भूमिका करणाऱ्या जॉनी यांनी आजपर्यंत तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. गरीबीमुळे केवळ सातवीपर्यंतच शिक्षण पूर्ण करू शकलेले जॉनी नंतर पैसे कमवून घरखर्चाला हातभार लावण्यासाठी अनेक प्रकारची कामं करू लागले.

गल्लोगल्ली पेन विकत फिरणे हे त्यापैकीच एक काम. ही कामे करताना जॉनी त्यावेळच्या सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यांच्या नकला करायचे आणि काही बॉलिवूड गाण्यांवर डान्सही करायचे. सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये ते हैद्राबादला होते. तिथूनच त्यांनी त्यांच्या स्टाईलची कॉमेडीची लकब उचलली आणि आज ती जगप्रसिद्ध आहे. ते त्यानंतर हिंदुस्थान युनिलिव्हर मध्ये ऑपरेटर म्हणून काम करू लागले.

कंपनीच्या वार्षिक समारंभात त्यांनी केलेल्या कॉमेडी आणि नकलांमुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना ‘जॉनी लिव्हर’ हे नाव दिले. पुढे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवल्यानंतरही त्यांनी ते नाव कायम ठेवले. आधीच्या काही वर्षांमध्ये जॉनी ऑर्केस्ट्रामध्ये स्टँडअप कॉमेडी करायचे. त्यांनी बरेच स्टेज परफॉर्मन्स केले आहेत. या क्षेत्रात चांगली कमाई व्हायला लागल्यावर त्यांनी १९८१ मध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर मधली नोकरी सोडली आणि स्टँडअप कॉमेडी व स्टेज शो करू लागले.

त्यांच्या ‘हँसी के हंगामे’ या ऑडिओ कॅसेट्स मुळे घराघरांत लोक त्यांचा आवाज ओळखू लागले. १९८२ मध्ये त्यांनी ‘दर्द का रिश्ता’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. १९९३ मध्ये आलेल्या ‘बाजीगर’ चित्रपटातील ‘बाबुलाल’ या भूमिकेने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांचे खूप वेळा ‘बेस्ट परफॉर्मन्स इन कॉमिक रोल’ साठी नामांकन झाले असून ‘दिवाना मस्ताना’, ‘दुल्हे राजा’, ‘राजा हिंदुस्तानी’ आणि ‘लव्ह के लिए कुछ भी करेगा’ या चित्रपटांमधील विनोदी भूमिकांसाठी पुरस्कारदेखील मिळाले आहेत.

हिंदी चित्रपटांबरोबरच त्यांनी काही गुजराती, कन्नड, तुलू, तमिळ, तेलगू आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ मधील त्यांच्या भूमिकेने लोकांना पोट धरून हसवले. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी काही टीव्ही शोज् मध्ये पण काम केले आहे. विनोदी भूमिकांबरोबरच जॉनी यांनी अनेक गंभीर भूमिकांमधून त्यांच्या अभिनयाची झलक दाखवली आहे.

असा हा अवलिया कलाकार केवळ आपल्या प्रतिभेच्या जोरावर आज करोडपती झाला आहे. पत्नी सुजाता, मुलगा जेस्सी आणि मुलगी जिमी समवेत ते आपले सुखी आयुष्य जगत आहेत. त्यांच्याबद्दल बोलू तेवढे कमीच आहे. त्यांच्या प्रतिभेला आणि विनोदबुद्धीला मनापासून सलाम!

 

You might also like