एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

करोडोंच्या घरात कमाई असून देखील या स्टार अभिनेत्याचे आई-वडील आजही करतात चक्क रिक्षाने प्रवास, कारण ऐकुन व्हाल थक्क!

ज्याच्या बाॅडीवर तरूणाई फिदा आहे, इतकंच काय त्याला आदर्श मानून त्याच्यासारखी बाॅडी बनवण्याचा त्याचे अनेक चाहते प्रयत्न करत असतात. तो म्हणजे बाॅलिवुड चा फिट मॅन जाॅन अब्राहम.

जाॅनचा जन्म १७ डिसेंबर रोजी कोची मध्ये झाला. सुरूवातीला एक माॅडेल म्हणून काम करणाऱ्या जाॅनने २००३ मध्ये बिपाशा बासुसोबत “जिस्म” चित्रपटातून बाॅलिवुडमध्ये एंट्री केली. त्याच्या अभिनय कोशल्यामुळे आणि विशेषत: बाॅडीमुळे त्याचे अनेक चाहते निर्माण झाले आहेत. आज तो बाॅलिवुड मध्ये एक स्टार कलाकार आहे.

जाॅन त्याच्या यशाच्या इतक्या उंच शिखरावर पोहचला असताना देखील त्याच्या पालकांविषयी एक कुतुहलाची गोष्ट भल्याभल्यांना विचार करायला प्रवृत्त करते. जाॅनला बाईक आणि कारचा भारी शौक आहे. त्याच्याजवळ आज घडीला यामाहा, यामाहा आरवन, कावासाकी निंजा, सुझुकी हायाबुसा, महिंद्रा मोजो या आणि अशा अनेक महागड्या दुचाकी आहेत. शिवाय कारमध्ये त्याच्याकडे अत्यंत मौल्यवान अशा लॅंम्बोर्गिनी गैलार्डो, निसान जीटी-आर, आॅडी क्यू थ्री, आॅडी क्यू सेव्हन या गाड्या आहेत. याव्यतिरिक्त प्रत्येक फिल्म ला जाॅनची कमाई करोडोंच्या घरात असते.

इतकी सारी कमाई आणि इतका सारा ऐशोआराम असुन सुद्धा जाॅनचे आई – वडील मात्र आजदेखील सार्वजनिक परिवहन गाड्यांचा वापर करतात. ही गोष्ट एका मुलाखती दरम्यान जाॅनने प्रेक्षकांना सांगितली.

विशेष म्हणजे जाॅनची आई कधी कधी चक्क ऑटोरिक्षाने सुद्धा प्रवास करते. हे सांगायलाही जाॅन विसरला नाही. जाॅनला एलस नावाचा एक भाऊ आहे. मलियाली ख्रिश्चन त्याचे वडील तर इरानी ही त्याची आई आहे.

आपल्या आईवडिलांचा हाच साधेपणा फारवेळा जाॅनमध्येही दिसुन येतो. जाॅन अब्राहम हा मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा आहे. त्यामुळेच त्याला त्याची किंमत आहे.

बाॅलीवूड ची पार्टी म्हटलं की प्रेक्षकांना उत्सुकता असते कि आपल्या फेव्हरेट अभिनेत्याने /अभिनेत्रीने कोणते नवीन प्रकारचे कपडे परिधान केले आहेत. एकीकडे अशी अवस्था असुनदेखील जाॅन बॉलिवूडच्या हायफाय पार्टीत साधा टी – शर्ट आणि जीन्स घालणे पसंत करतो.

इतकच काय तो पायात महागडे बुट न वापरता साधी चप्पल वापरतो. काहीवेळा माध्यमांनी विचारल्यावर तो म्हणतो की चप्पल घालणे मला आरामदायक वाटते.

जाॅनच्या बाॅडी च्या रहस्याबद्दल विचारले असता तो म्हणतो,”मी जेव्हा २२ वर्षांचा होतो तेव्हा हाॅलीवूडचा स्टार सिल्वेस्टर स्टॅलोनचा ‘राॅकी ४’ हे. चित्रपट पाहिला. याचीच प्रेरणा घेऊन मी स्वतः ला फीट ठेवू लागलो.” सुरूवातीच्या काळात जाॅन एक माॅडेल म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या जाहिराती त्याने केलेल्या आहेत. जाॅन अब्राहम ने १९९९ मध्ये ग्लॅडरेस मैनहंट ही स्पर्धा सुद्धा जिंकली होती. त्यानंतर जाॅन बऱ्याच संगीत व्हिडिओ मधून प्रेक्षकांसमोर येत राहिला.
.
बाॅलिवुड सारख्या चंदेरी दुनियेत येऊन देखील त्याचा आणि त्याच्या आईवडीलांचा हा साधेपणा समाजात एक आश्वासक चित्र उभं करतो आहे. त्याचे अनेक चाहते त्याच्या या गुणामुळे ही त्याच्या प्रेमात असल्याचे दिसून येते. ‘जिस्म’ चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर जाॅनने ‘धूम’ (२००४) हा चित्रपट केला. या चित्रपट त्या काळी अत्यंत गाजलेला चित्रपट ठरला. याच चित्रपटाने जाॅनला यशाच्या शिखरावर पोहचण्यास सुरूवात केली.

‘जिस्म’, ‘धूम’, ‘जिंधा’, ‘वाॅटर’ , ‘दोस्ताना’, ‘फोर्स’, ‘शूट आऊट ॲट वडाला’, ‘मद्रास कॅफे’, ‘वेलकम बॅक’, ‘प्रमाण’, ‘सत्यमेव जयते’ आणि ‘बाटला हाऊस’ या त्याच्या काही गाजलेल्या चित्रपटांची नावे आहेत.

जाॅनचे लग्न प्रिया रूंचाल हिच्याशी झाले आहे. केवळ अभिनयच न्हवे तर निर्मितीच्या क्षेत्रातही जाॅनने पाऊल टाकले असुन ‘विकी डोनर’ या चित्रपटाची निर्मिती जाॅनने केली होती.

You might also like