एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘तारक मेहता का…’ मधील जेठालाल करणार का भाजप मध्ये प्रवेश? दिलीप जोशींनी सांगितले…

छोट्या पडद्यावरील अनेक वर्षं चाललेल्या मालिकांपैकी एक म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका. प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरून प्रेम दिलेलं आहे. अजूनही प्रेक्षक या मालिकेवर तितकंच प्रेम करतात. या मालिकेतील सगळेच कलाकार आता प्रेक्षकांच्या घरचे असल्यासारखे झाले आहेत. मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. एका दशकापेक्षा जास्त ही मालिका न थांबता प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

यातील जेठालाल गडा हे पात्र तर प्रेक्षकांच्या विशेष आवडीचं आहे. आपल्या अलग ढंगाने बोलणारा जेठालाल गडा प्रेक्षकांना खूप हसवतो. आपल्या वडिलांना घाबरून राहणारा, बायकोवर चिडचिड करणारा, पोराच्या करामतींना वैतागलेला, तारक मेहताचा जिगरी दोस्त, अय्यर वर जळणारा, बबिताजींच्या समोर साळसूद वागणारा, भिडे वर खार खाऊन असणारा पण कसाही असला तरी आपल्या कुटुंबावर आणि शेजाऱ्यांवर प्रेम करणारा असा हा जेठालाल गडा प्रेक्षकांचा भलताच लाडका आहे.

जेठालाल गडाचे हे अजरामर पात्र साकारले आहे अभिनेते दिलीप जोशी यांनी. ‘जेठालाल’ या पात्रामुळे दिलीप जोशी हे नाव आता घराघरांत पोचले आहे. घरातील अबालवृद्ध यांना हे नाव आता माहीत झालं आहे. अशा या सेलिब्रेटी व्यक्तिमत्वाबद्दल लोकांना फार कुतूहल आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय चाललेलं असतं, याबद्दल जाणून घेण्यात लोकांना फार रस आहे.

२०१८ मध्ये राजस्थानमध्ये झालेल्या एका निवडणुकीत दिलीप जोशी एका रोड शो मध्ये भाजप चा प्रचार करताना दिसून आले होते. आता पुन्हा दिलीप जोशी यांच्या राजकारण प्रवेशावरून चर्चा रंगली आहे. दिलीप जोशी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार, अशा चर्चा होत आहेत. यावरून दिलीप जोशी यांना त्यांच्या राजकारण प्रवेशाबद्दल प्रश्न विचारण्यात आले.

एका ऑनलाईन चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत याचं उत्तर देताना ते म्हणाले, “नाही, राजकारण हा माझा प्रांत नाही. पण जर कुणी आप्तस्वकीय किंवा ओळखीचे, ज्यांना नकार देणं अवघड आहे, अशा लोकांनी सांगितलं तर त्यात भाग घ्यावा लागतो. पण मी अशा गोष्टी शक्यतो टाळतो. कारण कॅम्पेन्स करणं किंवा रोड शो करणं ही खूप अवघड आणि थकवणारी गोष्ट आहे.”

दिलीप जोशी अनेक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करताना दिसतात. पंतप्रधानांनी काही गोष्टींवर चर्चा करण्यासाठी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ च्या कलाकारांना भेटीसाठी आमंत्रित देखील केले होते.

You might also like