एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘जय मल्हार’ मधील म्हाळसा खऱ्या आयुष्यात आहे इतकी सुंदर आणि ग्लॅ’मरस! पहा फोटो…

झी मराठी वाहिनी वरील ‘जय मल्हार’ (२०१४) मालिकेचे प्रेक्षकांच्या मनातील स्थान काही वेगळेच आहे. अनेकांचे कुलदैवत असलेल्या भगवान श्री मार्तंड मल्हार यांच्याबद्दल या मालिकेतून सांगण्यात आले होते. या कुलदैवताबद्दल माहीत नसलेल्या अनेक गोष्टी या मालिकेमुळे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या.

खंडोबाच्या दोन पत्नी होत्या- म्हाळसा आणि बानू. खंडोबांनी दोन लग्नं का केली ते या मालिकेच्या निमित्ताने लोकांना समजले. या मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या व्यक्तिरेखा खूप समजून उमजून पार पडल्या होत्या. त्यामुळे या कलाकारांना त्यांच्या व्यक्तिरेखांच्या नावानेच ओळखले जाऊ लागले.

यातीलच एक व्यक्तिरेखा होती म्हाळसाची. ही व्यक्तिरेखा साकारली होती सुरभी हांडे या अभिनेत्रीने. सुरभीच्या या भूमिकेचे खूप कौतुक झाले. तिला या मालिकेमुळे खूप प्रसिद्धी मिळाली. लोक सुरभीला ‘म्हाळसा’ म्हणूनच ओळखू लागले. तिच्या या भूमिकेने तिला घराघरांत नेऊन पोचवले. तर अशी ही सुरभी वयाच्या १६ व्या वर्षापासूनच मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. तिने वयाच्या १६ व्या वर्षी ‘स्वामी’ या नाटकातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले.

सुरभीने ऑल इंडिया रेडिओ च्या ‘सुगम संगीत कार्यक्रम’ साठी देखील काम केले आहे. स्टार प्रवाह वाहिनी च्या ‘आंबट गोड’ (२०१२) या मालिकेत तिने नकारात्मक भूमिका साकारली होती. कलर्स मराठी वाहिनी वरील ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ (२०१८) या मालिकेत तिने ‘आरवी’ ची भूमिका निभावली होती. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अगंबाई अरेच्चा २’ या चित्रपटात तिने छोटीशी पण महत्त्वाची भूमिका साकारली होती.

सुरभी मूळची जळगावची आहे. सुरभीला गाण्याची आवड आहे. तिचे वडील संजय हांडे हे संगीत क्षेत्रातील एक गाजलेलं नाव आहे. सुरभीने दुर्गेश कुलकर्णी सोबत लग्नगाठ बांधली आहे. सुरभी आणि दुर्गेश एकमेकांचे चांगले मित्र होते. मग हे मैत्रीचं नातं प्रेमात बदललं आणि दोघांच्या घरच्यांच्या आशीर्वादाने फेब्रुवारी २०१९ मध्ये या दोघांनी पुण्यातल्या प्रसिद्ध ढेपेवाडा येथे लग्न केले. या वाड्याला पारंपारिक वारसा लाभला आहे, म्हणूनच त्यांनी आपल्या या मंगल कार्यासाठी हे ठिकाण निवडले.

सुरभी सोशल मीडिया वर सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. या प्रसिद्ध ‘म्हाळसा’ चे सोशल मीडिया वरील फोटो पाहिले असता लक्षात येईल की सुरभी खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस दिसते. तिच्या कातिल अदांनी तर चाहते घायाळच होतात. काय मग मंडळी, तुम्हीही आहात का सुरभीचे दिवाणे? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.

You might also like