एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेद्वारे हा अभिनेता करणार टीव्ही मालिकेत प्रदार्पण, जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार अभिनेत्री निशिगंधा वाड..

ना शिवशंकर… तो कैलाशपती,
ना लंबोदर… तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो…
।। राजा शिवछत्रपती ।।

शिवाजी महाराज नाव घेतलं की ज्याच्या तोंडी जय भवानी जय शिवाजी असा शब्द येतो तो खरा मराठी, हे वाक्य आपण कित्येक वेळा तरी ऐकलं असेल. आज आम्ही याच विषयी बोलणार आहोत सध्या छत्रपती शिवाजी महाराजांनच्या जीवनावर कथित असलेल्या काही मालिका टीव्ही सिरीयल वर आपल्याला पाहायला मिळतील.

शिवाजी महाराजांचा रोल साकारायचा म्हणजे त्यांच्या प्रत्येक गोष्टी आचरणात आणाव्या लागतात. सख्खी असो किव्हा परकी ! बहिणीची अ’ब्रू कायम राखणे, आपल्या जनतेचा विचार करणे कोण्ही दुःखी असेल तर त्याला आनंदी करण्यासाठी उपाय करणे. अश्या खूप साऱ्या गोष्टी आचरण मध्ये आणाव्या लागतात. मग आपण पाहत असलेला रोल आपल्याला हवा हवासा वाटतो.

सध्या कथा शिवबांच्या शिलेदारांची या नावाने भन्नाट टायटल असणारी सिरीयल ‘जय भवानी जय शिवाजी’, सध्या स्टार प्रवाह वर आपल्याला पाहायला मिळत असेल. या मालिकेत आपल्याला सुप्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाढ आपल्याला पाहायला मिळाली असेल जी तब्बल एक दशकानंतर टीव्ही मालिकेतून प्रदार्पण केलीये.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

निशिगंधा वाड जेव्हा जिजाऊ मातेच्या भूमिकेबद्दल बोलताना म्हणाल्या की, ताठ कण्याच्या, कर्तबगार, कर्तृत्ववान जिजाऊ ही भूमिका साकारणं खुप मोठी मानाची गोष्ट आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या स्थापनेसाठी मोलाचा वाटा आहे. अशी थोर मोठी भूमिका साकारण माझ्यासाठी दैवी योग आहे.

त्याचबरोबर या मालिकेतून अभिनेता भूषण प्रधान तब्बल ८ वर्षांनी टीव्ही मालिकेत काम करणार आहे अभिनेता भूषण प्रधान हे छत्रपती शिवाजी महाराजांनी भूमिका साकारणार आहेत. भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी शरीरवृष्टीवर मेहनत घेत आहे त्याचबरोबर तो घोडेस्वारी शिकत आहे. अभिनेता भूषण प्रधान वर एक मोठी आता जवाबदारी आहे.

त्याचबरोबर या मालिकेत वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत आपल्याला सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव दिसणार आहेत, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनसाठी स्वतःला अर्पण करणारे शिवा काशिद यांचा रोल विशाल निकम साकारणार आहेत. ही मालिका तुम्हाला कशी वाटते आम्हाला नक्की कमेंट्स द्वारे सांगा..

You might also like