एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

कॉल सेंटरवरून थेट वीर चित्रपटात काम.. या अभिनेत्रीच्या जिंदगीचे असे केले भाईजानने सोने..

भाईजान अर्थातच बॉलीवूडमधला सुपरस्टार सलमान खान हा नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतो. सलमान खान हा सतत उत्तम कामे करत असतो. बिंग ह्यूमन च्या माध्यमातून सतत दान धर्म करत असतो.

सलमान खानने अनेक नवोदीत कलाकारांना संधी देऊन त्यांच्या करीअरचे सोने केले आहे. अशी एक ख्यातनाम अभिनेत्री जरीन खान हीच्यासुद्धा यशामागे सलमान खानचाच हात आहे. तर जाणून घेऊया जरीनाचा हा सिनेप्रवास.

सन १९८७ साली जरीन खान हीचा जन्म झाला. तिची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यातच तिच्या आई बाबांनी एकमेकांपासून घ’ट’स्फो’ट घेतला. यावेळी पूर्ण कुटुंबाची जबाबदारी जरीनवर येऊन पडली. तिने पैसे कमवण्यासाठी धडपड करायला सुरुवात केली.

याच काळात तिने कॉल सेंटर वर काम करायला सुरूवात केली. कॉल सेंटर वर काम करत असतानाचे तिचे वजन तब्बल १०० किलो इतके होते. हे सुद्धा तिच्यासमोरचे एक मोठे आव्हान होते. पण जरीन खान ही परिस्थितीशी कडा संघर्ष करत राहिली.

त्यानंतर जरीनने एअर होस्टेस होण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने तिचे बरेच वजन घटवले. मेहनत घेतली. एअर होस्टेसची नोकरी करत असताना तिची ओळख भाईजान अर्थात सलमान खान याच्याशी झाली. त्याकाळी सलमान खान हा युवराज या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त होता.

सलमान खानची टिम ही त्याच्या पुढच्या चित्रपटाच्या कास्टींगसाठी धडपडत होती. तेंव्हा सलमानने त्याच्या टिमला जरीन हिचे नाव सुचवले. इतक्या मोठ्या स्टारने नाव सुचवले असल्याकारणाने जरीनही नकार देऊ शकली नाही. अशाप्रकारे जरीन खान ही सलमान खानच्या मदतीमुळे वीर या चित्रपटात झळकली. या चित्रपटातून तिने बॉलीवूडमधे पाय ठेवला आणि काही काळातच तो रोवलासुद्धा.

बरेच जण म्हणायचे की जरीन ही कतरीनासारखी दिसते. कदाचित सलमानने तिला चित्रपट देण्यामागे हेसुद्धा एक कारण असू शकते. वीर चित्रपटाच्या निमित्ताने जरीन खान आणि सलमान खान बऱ्याच जागी एकत्र दिसून आले. यानंतर त्या दोघांच्या अफे’अरच्या अफ’वासुद्धा उठल्या.

पण त्यांच्या दोघातले संबंध हे फक्त मैत्रीपूर्ण आणि व्यावसायिक असल्याचे समोर आले. यानंतर जरीन खानने हाऊसफुल २, अक्सर २ आणि हेट स्टोरी ३ या चित्रपटांतही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.

जरीन खानच्या चाहत्यांसाठी एक खशखबर आहे. लवकरच जरीन खान हीचा नवीन चित्रपट सर्वांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव “हम भी अकेले तुम भी अकेले” असे असून लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जरीन खान ही महत्वाची भूमिका साकारणार आहे. जरीन खान हीच्या या संपूर्ण वाटचालीचे श्रेय सलमान खानला जाते.

You might also like