एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

रवींद्र जडेजाची पत्नी आहे या करोड़पति व्यावसायिकाची मुलगी, लग्नाधीच जावयाला दिली होती १ कोटीची ऑडी कार भेट..

चहा आणि क्रिकेट या भारतीयांच्या दोन अत्यंत आवडत्या गोष्टी आहेत. त्यामुळे रोज चहा आणि त्याबरोबर क्रिकेट विश्वातली एखादी चर्चा करण्यासारखी गोष्ट हे तर अगदी ठरलेलंच आहे. क्रिकेटपटू म्हणजे आपल्याकडे एखाद्या स्टारपेक्षा कमी नाहीत. त्यामुळे त्यांच्या खेळाचे जसे लोक चाहते आहेत, तसेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातदेखील लोकांना तेवढाच रस आहे.

क्रिकेटपटूंनी किती बॉल्स मध्ये किती धावा केल्या, किती विकेट्स घेतल्या, कोणत्या क्रिकेटपटूने किती सामने खेळले आहेत, कोणता सामना कोणत्या मैदानावर झाला, कोणता संघ किती सामने खेळला आहे या सर्व गोष्टींची क्रीडा रसिक खबरबात ठेवतात. त्याचप्रमाणे ते आपल्या आवडत्या क्रिकेटपटूच्या खासगी आयुष्यात काय चालले आहे, यावरही लक्ष ठेवून असतात.

आज आपण जाणून घेऊयात रवींद्र जडेजा या क्रिकेटपटूच्या पत्नीबद्दल. रवींद्र जडेजाचा खेळ नेहमीच कौतुकास्पद राहिला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही प्रकारात रवींद्र जडेजा उत्तम खेळतो. त्याच्या या कौशल्याने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. जेव्हा त्याच्या लग्नाचा विषय घरात सुरू झाला, तेव्हा त्याच्या बहिणीने त्याच्यासाठी एक स्थळ आणलं. दोघांच्या भेटीची वेळ ठरली.

खरंतर या भेटीसाठी जडेजा तसा निरुत्साहीच होता. अनिच्छेने तो त्या मुलीला भेटायला गेला. मात्र दोघांची भेट होताच एक वेगळाच चमत्कार झाला. जडेजाला ही मुलगी बघता क्षणी आवडून गेली.

पहिल्याच भेटीत तो तिच्याकडे आकर्षित झाला. ही मुलगी होती रिवा सोलंकी. त्या भेटीत जडेजाला रिवा हुशार आणि सुशिक्षित वाटली. दोघांनी एकमेकांचे नंबर शेअर केले. थोडे दिवस दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. यातून ते एकमेकांच्या जवळ आले. एकमेकांबद्दल विश्वास वाटायला लागल्यानंतर दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला.

राजकोटच्या कंत्राटदार आणि लक्षाधीश व्यायवसायिक म्हणजे हरदेवसिंग सोलंकी. रिवा त्यांची एकुलती एक मुलगी आहे. रिवाची आई प्रफुल्लबा रेल्वेमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहे. त्यांच्या मालकीच्या दोन खासगी शाळा आणि एक हॉटेल देखील आहे.

रिवाचे काका हरीसिंग सोलंकी गुजरात काँग्रेसमध्ये मोठ्या पदावर आहेत. रिवाने मेकॅनिकल इंजिनियरींग मध्ये बीटेक पदवी मिळवली आहे. यूपीएससीची तयारी करण्यासाठी रिवा दिल्लीला आली.

रिवाच्या वडिलांनी लग्नाआधीच जडेजाला एक कार भेट दिली. ही कर जवळपास एक कोटी रुपयांची ऑडी क्यू ७ कार होती. १७ एप्रिल २०१६ रोजी रिवा आणि रवींद्र जडेजाने लगीनगाठ बांधली. या दोघांना जून २०१७ मध्ये कन्यारत्नाची प्राप्ती झाली.

You might also like