एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

फँड्री मधील जब्या येतोय पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, आगामी चित्रपटात ह्या अभिनेत्री सोबत करतोय काम, चित्रपटाचे नाव…

मराठी इंडस्ट्रीची सुद्धा आज काल बॉलिवूड इंडस्ट्रीशी तुलना केली जाते, मराठी मधील खूप सारे कलाकार आज मेहनतीच्या बळावर बॉलिवूड मध्ये त्यांनी आपली जागा प्रस्तापित केली आहे, मराठी चित्रपट आज कोटीच्या घरात हिट होत आहेत. मराठी मध्ये अशे खूप कलाकार आहेत ज्यांनी आधी हिट फिल्म दिली पण नंतर ते तुम्हाला कुठेच देखील दिसले नाहीत आम्ही सांगतोय मराठी चित्रपट फँड्री बद्दल ह्या फिल्मचे डायरेक्टर नागराज मंजुळे यांनी ही फिल्म घडवून आणली यातील मुख्य कलाकार जब्या आजदेखील प्रेक्षकांच्या लक्ष्यात चांगलाच आहे.

पण ही हिट फिल्म देऊन तू कुठे असेल आणि तो काय करत असेल असं तुम्हाला वाटत असेल तर आम्ही तुम्हला सांगतो… नेमकं जब्या सध्या काय करतोय माहितीनुसार तो एका नवीन चित्रपटात आपल्या भेटीला येणार आहे त्यासमवेत सैराट फेम अरबाज आणि लंगड्या प्रदीप हे दोघे दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यानमध्ये चर्चेच वातावरण खूप दिसतंय.

खूप दिवसांनंतर त्याच्या लूक मध्ये खूप बदल झाला जब्या म्हणजेच सोमनाथ अवघडे त्याच्या नवीन लूक मुळे पून्हा चर्चेत आलाय तुम्हाला माहीत नसेल की फँड्री मधील जब्या भूमिकेसाठी सोमनाथ अवघडे याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर तो कुठेच आणि कोणत्याच फिल्म मध्ये दिसला नाही पण आत्ता आगामी फिल्म मुळे त्याचे नवीन काही लूक मधील फोटो समोर आले आहेत ह्यावरून हे कळत की जब्या आत्ता खूप मोठा झाला आहे त्याचा नवीन फोटो हा त्यांच्या आगामी चित्रपटातीला आहे असं सांगण्यात येतंय.

सुनिल मगरे दिग्दर्शित ‘फ्री हिट दणका’ ही फिल्म १६ एप्रिल २०२१ रोजी प्रेक्षकांनच्या भेटीस येणार आहे, चित्रपट मधील पोस्टर कलाकार समोर आलेच आहेत त्याचबरोबर त्या फिल्म मधील गाणी सुद्धा रिलीज झाली आहेत ह्या फिल्म मधील पाहिलं गाणं ‘रंग प्रीतीचा बावरा’ हे गाणं सोमनाथ अवघडे आणि अपूर्वा एस. यांच्यावर चित्रित केलेले आहे.

ह्या गाण्याला संगीत बबन अडागळे आणि अशोक कांबळे आणि शब्द संजय नवगिरे यांनी रचले आहेत. ह्या फिल्म मधील गाणं जसराज जोशी यांनी गायलं आहे तर नवीन मराठी सिने गायिका स्वामी शैलेश १७ वर्षीय नवोदित गायिका लाभली आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक सुनील मगरे यांनी ह्या गाण्याच शुटिंग क रो नाच्या काळात केलं आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like