एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

कतरीना पाठोपाठ आता तिच्या बहिणीचे जलवे! कतरीना सारखीच सुंदर आहे तिची बहीण..

कतरीना कैफ च्या सुंदरतेचे अनेक चाहते आहेत. तिची बॉलिवूड एन्ट्री झाली तेव्हा तिच्यावर बरीच टीका झाली. पण या टीकेकडे लक्ष न देता तिने स्वतःमध्ये सुधारणा करत स्वतःला सिद्ध केलं.

आज बॉलिवूड च्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचं नाव घेतलं जातं. मॉडेलींग करत तिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. सुरुवातीच्या तिच्या काही चित्रपटांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. मात्र तिने नंतर एका पाठोपाठ एक हिट चित्रपटांची मालिकाच लावली.

बूम (२००३) या चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणाऱ्या कतरीनाने नंतर नमस्ते लंडन (२००७), न्यू यॉर्क (२००९), अजब प्रेम की गजब कहानी (२००९), राजनीती (२०१०), जिंदगी ना मिलेगी दोबारा (२०११), मेरे ब्रदर की दुल्हन (२०११), एक था टायगर (२०१२), धूम ३ (२०१३), बँग बँग (२०१४), टायगर जिंदा है (२०१७) यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं. फॅशन मॉडेल म्हणून प्रसिद्धी मिळल्यावर तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

मूळची ब्रिटिश असलेली कतरीना कैफ आपल्या बहिणींच्या खूपच जवळ आहे. तिच्या बहीणीदेखील तिच्यासारख्याच सुंदर आहेत. यातली एक बहीण आता कतरीना पाठोपाठ बॉलिवूड मध्ये पदार्पण करत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Isabelle Kaif (@isakaif)

इझाबेल कैफ असे तिच्या बहिणीचे नाव आहे. कतरीनाने वयाच्या १४ व्या वर्षी हवाई मधील एक सौंदर्यस्पर्धा जिंकली आणि तिला मॉडेलींगचे पहिले काम मिळाले. इझाबेलने देखील आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत वयाच्या १४ व्या वर्षी मॉडेलींग सुरू केले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Isabelle Kaif (@isakaif)

पुढे जाऊन इझाबेलने आपल्या बहिणीसारखाच अभिनय क्षेत्रात कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाला तिचे पालक तयार नव्हते. कतरीनाने मग त्यांची समजूत घालत आपल्या बहिणीला अभिनय क्षेत्राचे दरवाजे खुले करून दिले. सोशल मीडिया वर इझाबेलच्या फॅशन फोटोज् ची खूप चर्चा होते. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Isabelle Kaif (@isakaif)

इझाबेलने मार्च २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टाईम टू डान्स’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती सूरज पांचोली या अभिनेत्यासोबत दिसली होती. सध्या ती सलमान खान च्या प्रोडक्शन हाऊस द्वारे निर्मिती केल्या जाणाऱ्या एका चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे.

काय मग मंडळी, कशी वाटली ही कैफ भगिनींची जोडी? आवडली ना? या कैफ भगिनींपैकी तुमची आवडती अभिनेत्री कोणती हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका.

You might also like