एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने! ऑलिम्पिक मध्ये होणार महामुकाबला…

भारत आणि पाकिस्तान हे देश आता लवकरच पुन्हा आमने-सामने येणार आहेत. पण हा सामना नेहमीसारखा क्रिकेटचा नसणार आहे. सध्या हवा आहे ऑलिम्पिक गेम्स ची. यंदाच्या ऑलिम्पिक मध्येच हे दोन देश पुन्हा आमने-सामने येत आहेत. त्यामुळे हा सामना चुरशीचा होणार हे आधीच दिसतं आहे. क्रीडा रसिक आजपासूनच या सामन्यासाठी सरसावून बसले आहेत.

हा सामना होणार आहे भालाफेकीचा. ७ ऑगस्ट रोजी हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. भारताच्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात भालाफेक या प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. भारताने आतापर्यंत ऑलिम्पिक २०२१ मध्ये एक रौप्य पदक तर दोन कांस्य पदके मिळवली आहेत.

नीरज च्या या यशाने अजुन एक पदक मिळवण्याची भारतीयांची आशा उंचावली आहे. ऍथलेटीक्स मध्ये पदक जिंकून ऑलिम्पिक मध्ये इतिहास घडवण्याची भारताला ही चांगली संधी आहे असे बोलले जात आहे.

भालाफेक चा हा सामना सुवर्णपदकासाठी होणार आहे. भारताचा नीरज चोप्रा (अ गट) आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम (ब गट) या स्पर्धेत ७ ऑगस्ट ला आमने-सामने येणार आहेत. या दोघांनी बुधवारी (४ ऑगस्ट) झालेल्या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे. नीरजने पहिल्याच प्रयत्नात जोरदार थ्रो करत अंतिम फेरी गाठण्यात यश मिळवले. त्यामुळे आता अंतिम फेरीकडे क्रीडा रसिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८६.६५ मीटर थ्रो करत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने पहिल्या प्रयत्नात ७८.५० मीटर थ्रो केला होता.

दुसऱ्या प्रयत्नात मात्र त्याने ८५.१६ मीटर थ्रो करत अंतिम फेरीत प्रवेश केला. भालाफेकीत अ आणि ब गटातील ८३.५० मीटरची पात्रात पातळी गाठणाऱ्या १२ अव्वल खेळाडूंना अंतिम फेरीत प्रवेश दिला जातो. या यादीत नीरज पहिल्या स्थानावर तर नदीम तिसऱ्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर नीरजचा मैदानाबाहेर मित्र आणि मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी असलेला जोहान्स व्हेटर आहे.

पाकिस्तानचा अर्शद नदीम आधी क्रिकेट खेळायचा. पण त्याने ऍथलेटीक्स मध्ये नशीब आजमावायचे ठरवले. २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर नदीमने सांगितले, की भारताच्या नीरजला बघूनच त्याने भालाफेक खेळण्याचा निर्णय घेतला. ७ ऑगस्ट ला होणाऱ्या या लढतीसाठी क्रीडा रसिक सरसावून बसले आहेत. आतापासूनच या सामन्याची चुरस वाढली आहे. अंतिम फेरीत सुवर्णपदक कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहण्यासाठी क्रीडा रसिक उत्सुक आहेत.

You might also like