एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

श्रेयस तळपदेच्या अडचणीत वाढ! दाखल झाली तक्रार…

अभिनेता श्रेयस तळपदे सध्या त्याच्या छोट्या पडद्यावरील पुनरागमनासाठी सज्ज होत आहे. श्रेयस तळपदे झी मराठी वाहिनी वरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तब्बल १७ वर्षांनी श्रेयस छोट्या पडद्यावर काम करताना दिसणार आहे.

श्रेयस तळपदेने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यावरूनच केली होती. पुढे मराठी चित्रपटांमध्ये काम करत त्याने हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव कमावले. सध्या मात्र श्रेयस तळपदे एका नव्या प्रकरणात अडकला आहे.

श्रेयस तळपदेच्या विरोधात नुकतीच शिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. परवानगी न घेता बेकायदेशीररित्या व्यवसायिक प्रोजेक्टसाठी सेट वापरला, म्हणून एका निर्मात्याने ही तक्रार दाखल केली आहे.

को’रो’ना काळात गेल्या वर्षभरापासून सर्व नाटकांचे प्रयोग बंद आहेत. ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटकही याला अपवाद नाही. त्यामुळे या नाटकाचा सेट वापराविना तसाच पडून आहे. सुरेश सावंत यांनी हा सेट श्रेयसला त्याच्या प्रोजेक्टसाठी वापरायला दिला. मात्र हे सर्व निर्मात्यांच्या परवानगीशिवाय झाले असल्याचे सांगत ही तक्रार करण्यात आली आहे.

श्रेयसने हा सेट आपला आगामी व्यवसायिक प्रोजेक्ट ‘भक्षक’ साठी वापरला आहे. सुरेश सावंत यांनी हा सेट श्रेयस तळपदेला त्याच्या व्यावसायिक प्रोजेक्टसाठी वापरायला दिला आहे, हे समजल्यावर ‘अद्वैत थिएटर’ या संस्थेचे निर्माते राहुल भंडारे यांनी याबाबत सुरेश सावंत यांना जाब विचारला. सुरेश सावंत यांनी यावर सेट तसाच पडून असल्याने श्रेयस तळपदेला वापरायला दिला, असे सांगितले.

मात्र सुरेश सावंत यांनी हा सेट निर्माते राहुल भंडारे यांना न विचारता श्रेयसला वापरायला दिला, असे राहुल भंडारे यांचे म्हणणे आहे. त्यावरून त्यांनी सुरेश सावंत आणि श्रेयस तळपदे या दोघांविरोधात शिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अभिनेता श्रेयस तळपदेने याबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये.

काही दिवसांपूर्वी श्रेयसने आपल्या मित्रानेच घात केल्यामुळे आपल्याला हिंदी चित्रपटसृष्टीत काम मिळत नसल्याचा आ’रो’प केला होता. प्रसार माध्यमांमध्ये त्याची ही पोस्ट खूप व्हायरल झाली होती. आता श्रेयस या तक्रार प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

श्रेयस सध्या आपल्या नव्या प्रोजेक्ट ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मध्ये व्यस्त आहे. या मालिकेत आपल्याला अभिनेत्री प्रार्थना बेहरे देखील दिसणार आहे. ती देखील तब्बल १० वर्षांनी छोट्या पडद्यावर काम करणार आहे. प्रार्थनाने देखील आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यावरूनच केली होती. श्रेयस आणि प्रार्थनाला पुन्हा छोट्या पडद्यावर बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

You might also like