एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा पास होऊन IAS ऑफिसर झालेल्या श्रुष्टी देशमुख यांच्याकडून जाणून घ्या यशाच्या टिप्स..

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे उदाहरण खूप उपयोगी आहे, पण या उदाहरणाला जागणारे खूप कमी लोक आहेत. आजकालची ही तरुणाई रिल्स वैगेरे यात गुंतून स्वतःला मोठं करू पाहतायत पण हे क्षणिक गोष्टी आहेत ज्या काहीतरी नवीन आले की निघून जातील. या गोष्टीला भुलून जात तरुणाई स्वतःच्या आयुष्याची वेळ चुकीच्या ठिकाणी वाया घालवत आहे पण १००% पैकी सुमारे १% तरुणाई असेल जी अभ्यास करून आई वडिलांचे नाव मोठे करू पाहतात.

आज आम्ही अश्याच एका गोष्टीबद्दल बोलणार जे ऐकून तुमच्या आयुष्याचे दिवस बदलतील तुम्ही सुद्धा याच जोशात येऊन यश प्राप्त करू शकता.

आज आम्ही तुम्हाला IAS अधिकारी सृष्टी देशमुख यांची गोष्ट सांगणार आहोत, ज्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करून आपले यश प्राप्त केले. अभियांत्रिकी मधून पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी यूपीएससी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एक अचूक वेगळा निर्णय स्वीकारला, ज्यामुळे त्यांनी पहिलेले स्वप्न खूप कमी वेळेत पूर्ण झाले. त्यांनी हे पद कसे प्राप्त केले याचेच त्या काही टिप्स देणार आहेत.

सृष्टी देशमुख मूळच्या भोपाळ, मध्य प्रदेशच्या आहेत. त्या नेहमी अभ्यासात हुशार असत त्यांनी इंटरमीडिएट नंतर इंजिनीअरिंग करायचे ठरवले. मात्र जेव्हा त्या तिसऱ्या वर्षात शिकत होत्या, तेव्हा त्यांनी सिव्हिल सर्व्हिसमध्ये करियर बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तिसऱ्या वर्षापासूनच नागरी सेवांची तयारी करण्यास सुरवात केली. त्यांचे पदवीधर शिक्षण पूर्ण होताच त्यांनी पूर्ण लक्ष देऊन तयारी सुरू केली आणि खूप सारे कष्ट घेतले.

सृष्टी यांचा असा विश्वास आहे की जर तुम्ही यूपीएससीची चांगली रणनीती आणि योग्य अभ्यास साहित्यासह तयारी केली तर तुम्हाला लवकरच यश मिळेल. या व्यतिरिक्त, सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला स्वतःला नकारात्मक लोकांपासून दूर ठेवावे लागेल, जे तुम्हाला सतत डिमोटिव्हेट करण्याचा प्रयत्न करतील. सृष्टीच्या यांच्या मते असे लोक तुमच्या यशामध्ये अडथळा बनू शकतात, त्यामुळे सावध राहा.

You might also like