एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

चित्रपट ‘हम साथ साथ है’ मधील छोटी राधिका आता २२ वर्षांनी झाले एवढी मोठी, दिसते खूपच बोल्ड, आहे प्रसिद्ध..

जर आपण बॉलिवूड जगाबद्दल बोललो तर बॉलिवूडमध्ये असे बरेच चित्रपट आहेत जे आपल्याला अजूनही पुन्हा पुन्हा पाहायला आवडतात. यापैकी एक चित्रपट म्हणजे सूरज बड़जात्या यांचा ‘हम साथ साथ’ हा चित्रपट. जो संपूर्ण कुटुंबा सोबत पाहु शकतो आणि चित्रपटाचा संपूर्ण आनंद घेता येतो.

हा चित्रपट जरी बरीच वर्षे जुना असला तरीही त्यातील पात्र लोकांना अजूनही आठवतात. आता जेव्हा आपण या चित्रपटाबद्दल बोलत आहोत तेव्हा आपल्याला या चित्रपटामध्ये राधिकाची भूमिका साकारणारी गोंडस मुलगी आठवते का?

या चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून भूमिका साकारणारी हि मुलगी आता खूपच मोठी झाली आहे. तिचे खरे नाव झोया अफरोज असे असून ती आता २३ वर्षांची आहे आणि आजही ती लहानपणी दिसण्याइतकीच गोंडस दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zoya Afroz (@zoyaafroz)

याशिवाय झोया अफरोज ही एक भारतीय अभिनेत्री तसेच एक मॉडेल सुद्धा आहे. फार थोड्या लोकांना माहिती आहे की झोयाने अभिषेक बच्चन यांच्या ‘कुछ ना कहो’ या चित्रपटातही तिच्या अभिनयाची कौशल्ये दाखविली होती आणि या चित्रपटातही तिने एका बाल कलाकाराची भूमिका केली होती.

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की झोयाने वयाच्या ९ व्या वर्षापासून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आहे. यासह झोयाने सुप्रसिद्ध टीव्ही शो सोन परीमध्ये हि बालकलाकार म्हणून काम केले आहे. टीव्ही आणि चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून आपली छाप सोडल्यानंतर झोयाने २०१४ मध्ये आलेल्या ‘द एक्सपोज’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zoya Afroz (@zoyaafroz)

झोयाने २०१३ मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनलचे विजेतेपदही जिंकले होते. झोया हि सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते, आणि ती तिची काही हॉट छायाचित्रेही इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिचे फोटो पाहून तुम्ही हि तिचे चाहते व्हाल.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

You might also like