एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

नाशिकमधील रेव्ह पार्टीतून अटकेनंतर चर्चेत आलेली अभिनेत्री हिना पांचाळ…नेमकी आहे तरी कोण?

सिनेस्टार खूपदा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या नव्या चित्रपटामुळे, कधी नव्या लूक मुळे, कधी त्यांच्या परदेश दौऱ्यांमुळे, कधी रिलेशनशिपमुळे, तर कधी अजून कशामुळे तरी. सिनेस्टार्स च्या सगळ्याच गोष्टींचं लोकांना कुतूहल असल्याने त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींची देखील मोठी बातमी होते. काही सिनेस्टार्स मात्र काही निगेटिव्ह न्यूज मुळे चर्चेत येतात.

आता हेच पाहा ना. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री हिना पांचाळ सध्या तिच्या अटकेमुळे चर्चेत आहे. नाशिकच्या इगतपुरी पोलिसांनी एका हाय प्रोफाइल रेव्ह पार्टीवर छापा टाकून बऱ्याच जणांना अटक केली आहे. यामध्ये काही परदेशी पाहुणे आहेत, तर काही बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतल्या चेहऱ्यांचा समावेश आहे.

अभिनेत्री हिना पांचाळ हिला आपण बऱ्याच चित्रपटांमधून आयटम सॉंग मध्ये पाहिलं आहे. परफ्यूम (२०१९), काय झालं कळंना (२०१८), शेंटीमेंटल (२०१७), हमी हैं तीन खुराफती (२०१४) यांसारख्या बऱ्याच हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये हिनाने आपले आयटम सॉंग्स सादर केले आहेत. तिने काही कन्नड, तेलगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही आयटम सॉंग्स केले आहेत. हिना २०१९ मध्ये आलेल्या मराठी बिग बॉस मध्ये स्पर्धक होती. मात्र ती अंतिम फेरीपर्यंत पोचू शकली नाही. २०२० मध्ये कलर्स टीव्ही वर प्रसारीत झालेल्या ‘मुझसे शादी करोगे’ या डेटींग रिऍलिटी शो मध्ये देखील हिना सहभागी झाली होती.

सध्या या अभिनेत्रीचे फोटो तिच्या अटकेनंतर सोशल मीडिया वर व्हायरल होत आहेत. या रेव्ह पार्टीमधून पोलिसांनी हिनासह २२ जणांना अटक केली आहे. यामध्ये एका परदेशी महिलेसह बारा महिला आणि दहा पुरुषांचा समावेश आहे. या सगळ्यांच्या रक्ताचे नमुने ड्रग्स व इतर अंमली पदार्थांच्या टेस्ट साठी पाठवण्यात आले आहेत.

नाशिक पोलिसांना या पार्टीची टिप मिळताच त्यांनी या पार्टीवर छापा टाकला. तिथे पोचताच त्यांना पुरुष व महिला आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. लागलीच पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेत अटक केली. यामध्ये बरेच जण हे बॉलिवूड व दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीशी निगडीत आहेत. अटक केलेल्यांमध्ये काही जण कोरिओग्राफरदेखील आहेत. फिल्म इंडस्ट्री मधील अनेक जण या रेव्ह पार्टीत सापडल्याने इंडस्ट्री मध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील तपास करत असून लवकरच याबाबत अजून माहिती समोर येईल अशी आशा आहे.

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला संपर्क करा.

You might also like