एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘तारक मेहता’ शोमध्ये पती-पत्नीची भूमिका साकारणारे हे कलाकार अजूनही खऱ्या आयुष्यात आहेत अविवाहित, कोणाचे वय ४० तर कोणाचे ३४..

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा प्रसिद्ध टेलिव्हिजन शो मागील १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. या कार्यक्रमाचे देश-विदेशात अनेक चाहते आहेत. हा कार्यक्रम केवळ टीव्हीवरील लोकांना हसवण्याचे काम करत नाही तर टेलीविजनच्या टॉप १० शोमध्येही आपले स्थान राखून आहे.

या शोमधील प्रत्येक पात्राची वेगळी ओळख आहे. आत अनेक स्टार्स विवाहित आहेत, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की शोमध्ये पती-पत्नीची भूमिका साकारणारे हे कलाकार अजूनही खऱ्या आयुष्यात अविवाहित आहेत.

पडद्यावर दिसणारे हे कलाकार आहेत अजून हि अविवाहित:
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ शो मधील हे कलाकार अजून आयुष्यामध्ये बैचलर जीवन उपभोगत आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला त्या ऑन स्क्रीन पात्रांविषयी सांगणार आहोत ज्यांनी शोमध्ये लग्न केले आहे. परंतु वास्तविक जीवनात अजून त्यांनी लग्नाचा विचार केला नाही.

बबिता अय्यर:
बबिता अय्यर उर्फ ​​मुनून दत्ता ही गोकुळधाम सोसायटीची सर्वात स्टाइलिश महिला असून कृष्णन सुब्रमण्यम अय्यर यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. शोमध्ये जेठालालला बबिता उर्फ ​​मुनमुन दत्ता खूप आवडते. शोमध्ये बबिताला तिचा सोबती मिळाला आहे पण आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की तिला वास्तविक जीवनात अद्याप तिच्या आवडीचा मुलगा सापडला नाही आणि ती अजून अविवाहित जीवन जगात आहे.

रोशनसिंग सोढी:
तारक मेहता का उल्टा चश्मा मधील रोशनसिंग सोधीची भूमिका साकारणारा गुरचरण सिंग शोमध्ये पत्नी ‘रोशन’, परंतु वास्तविक जीवनात तो अद्याप कुवारे आहेत. रोशनसिंग सोधीने आपल्या व्यक्तिरेखेने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे, परंतु वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी २०१३ मध्ये हा कार्यक्रम सोडला.

अंजली मेहता:
तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये तारक मेहताच्या पत्नीची भूमिका साकारणारी अंजली मेहता उर्फ ​​नेहा मेहता यांना या शोमध्ये एक बुद्धिमान आणि स्थायी नवरा मिळाला असेल, पण वास्तविक जीवनामध्ये नेहा अजून हि अविवाहित आहे. ३४ वर्षीय नेहाने अजून हि लग्नाचा विचार केला नाही.

कृष्णन अय्यर:
तारक मेहता का उल्टा चश्मा चे कृष्णन अय्यर आपणा सर्वांना माहितच आहे, ते या शो मधील सुंदर बबिता जीचे पती आहेत आणि जेठालाल सोबत त्यांचा ३६चा आकडा आहे. पण या शोमध्ये ऑन स्क्रीन पती बनलेल्या तनुजला अद्याप खऱ्या आयुष्यात नववधू मिळाली नाही. या शोमध्ये दक्षिण भारतीय अय्यरची भूमिका साकारणारा तनुज ४० वर्षांचा असून तो मध्य प्रदेशचा आहे. शोमध्ये त्यांची पत्नी बबिता जरी बर्‍यापैकी स्टायलिश आहेत, परंतु वास्तविक जीवनात हा अभिनेता अजूनही बॅचलर आहे.

बावरी:
तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये तुम्हाला बाघाच्या मागे दिवाणी बावरीची माहिती आहे. या अभिनेत्रीचे खरे नाव मोनिका भदोरिया आहे. शोमध्ये बावरीला तिचा बाघा मिळाला आहे, पण खऱ्या आयुष्यात ती तिचा वर शोधू शकलेली नाही. आणि ती अजूनही अविवाहित आहे. मोनिकाने काही कारणास्तव २०१८ मध्ये शोला निरोप दिला होता.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like