एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अफाट संपत्ती असूनही हे कलाकार जगतात साधे जीवन! पैशांचा जराही गर्व नाही…

चित्रपटसृष्टीतील कलाकार म्हटलं की त्यांना मिळणारी प्रसिद्धी आणि पैसा याचा सामान्य माणसाला हिशोबच लावता येत नाही. त्यामुळे सामान्य माणसाला नेहमीच अशा कलाकारांच्या जीवनशैलीबद्दल ओढ वाटत आली आहे. त्यांचं आलिशान घरांमध्ये राहणं, महागड्या गाड्यांमधून फिरणं, त्यांचे उंची कपडे आणि घड्याळं, त्यांचा रुबाब या सगळ्याच बाबतीत लोकांना कुतूहल असतं.

सिनेसृष्टीत काही कलाकार मात्र असे आहेत जे प्रचंड पैसा कमावतात, पण त्याचा त्यांना जराही गर्व नाहीये. हे कलाकार प्रचंड संपत्तीचे मालक आहेत. मात्र ते साधे जीवन जगणे पसंत करतात. एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे जगतात. पैशांचा माज करत नाहीत. अत्यंत साधेपणाने वागतात. चला तर अशा कलाकारांची माहिती आज जाणून घेऊया.

बॉबी देओल
सुरुवातीला जरी बॉबी देओलचे फारसे चित्रपट चालले नसले तरी तो एक उत्तम अभिनेता आहे, यात शंकाच नाही. अलीकडे पुन्हा त्याच्या कारकिर्दीने सुगीचे दिवस बघायला सुरुवात केली आहे. बॉबी देओल देखील आपल्या चित्रपटांमधून खूप कमाई करतो. मात्र त्याला या गोष्टीचा कोणताही माज नाही. आपले जीवन अत्यंत साधेपणाने व्यतीत करणे तो पसंत करतो. बॉबी देओलचा पंजाबमध्ये स्वतःचा मळा आहे. तो तिथे बऱ्याचदा शेती करायला जातो.

सलमान खान
आजच्या काळातील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये सलमान खानचं नाव घेतलं जातं. एखादा चित्रपट हिट ठरण्यासाठी केवळ सलमान खान हे नावच पुरेसं आहे. सलमान खानमुळेच बॉलिवूड मध्ये ‘१०० करोड क्लब’ चित्रपटांची सुरुवात झाली. कारण सलमानचे चित्रपट नेहमीच बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरत आले आहेत. जाहिराती आणि चित्रपटांमधून सलमानने बराच पैसा कमावला आहे. मात्र सलमान नेहमीच खूप साधे जीवन जगताना दिसतो. त्याला आपल्या करोडोंच्या संपत्तीचा जराही गर्व नाहीये. त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊस वर तो कधी कधी शेती करताना दिसतो.

अक्षय कुमार
अक्षय कुमार हा अजून एक असा अभिनेता आहे ज्याच्या केवळ नावावर चित्रपट चालतो. त्याचेही चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करतात. अक्षय कुमारने सुरवातीला खूप हलाखीचे दिवस पाहिले आहेत. त्यामुळे आज त्याच्याकडे करोडोंची संपत्ती असली तरी त्याला त्याचा माज नाहीये. चित्रपट आणि जाहिरातींमधून अक्षय कुमार वर्षाला करोडो रुपयांची कमाई करताना दिसतो. मात्र आपले जीवन तो अत्यंत साधेपणाने जगणे पसंत करतो. आपल्या कमाईतील बराचसा भाग तो देशासाठी दान करताना दिसतो.

You might also like