एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

हे आहेत भारताचे सर्वात ७ श्रीमंत क्रिकेटपटू, तरीही करत आहेत सरकारी नोकरी..कारण जाणून थक्क व्हाल!

भारताचे क्रिकेटर्स आणि क्रिकेट एसोसिएशन ऑफ इंडिया हा जगातील सर्वात श्रीमंत एसोसिएशन समजला जातो. आपल्या देशात क्रिकेटची पॉपुलैरिटी एवढी आहे कि इतर कोणत्याही देशात असू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि इतकी संपत्ती असूनही काही क्रिकेटपटू सरकारी नोकरी देखील करत आहे. वास्तविक, त्याच्या खेळामुळेच त्यांना सरकारी डिपार्टमेंट मध्ये नोकरी मिळाली आहे. चला मग जानूया अशा खेळाडू बद्दल..

महेंद्रसिंग धोनी :


टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून एमएस धोनी ओळखला जातो. २०१५ मध्ये एमएस धोनीला भारतीय सेना मध्ये लेफ्टिनेंट कर्नल म्हणून त्याची निवड झाली. धोनी भारतीय सैन्य दलाच्या सैनिकां सोबतही वेळ घालवतो आणि त्यावेळीच त्याचे फोटो सोशल मीडियावर शेयर करतो आणि ते फोटो खूप व्हायरल जातात.

सचिन तेंडुलकर :


भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा क्रिकेट विश्वाचा देव मानला जातो. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि सचिन च्या या यशा बद्दल इंडियन एयरफोर्स कडून सन्मानित करण्यात आले होते, आणि २०१० साली सचिनला भारतीय हवाई दलाचा ग्रुप कॅप्टन म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते.

हरभजन सिंग :


भारतीय संघाचा फॉर्मर स्पिनर हरभजनला विशेष महत्व आहे. विशेष म्हणजे, हरभजनने कसोटीत ७०० पेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत,आणि त्याच्या या मोठ्या योगदाना बद्दल त्याला पंजाब पोलिसात डीएसपी पदाचा मान देण्यात आला.

कपिल देव :


दिग्गज खेळाडू कपिल देव हा भारताचा कर्णधार होता ज्याने भारताला पहिला विश्वचषक जिंकला. त्यांना २००८ मध्ये इंडियन आर्मी मध्ये लेफ्टिनेंट कर्नल या पदाची जबाबदारी देण्यात आली होती. या व्यतिरिक्त, २०१९ मध्ये त्यांच्या सन्मानार्थ कपिल देव यांची हरियाणा क्रीडा विद्यापीठाचे कुलपती म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती.

उमेश यादव :
वेगवान गोलंदाज म्हणून उमेश यादवने भारतीय संघाला बरीच मोठी कामगिरी केली आहे. उमेशला पोलिस आणि सैन्यात नोकरी करायची होती, पण २०१७ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सहाय्यक व्यवस्थापक हे पद देण्यात आले.

युजवेंद्र चहल :
सर्वांच्या तुलनेत चहल हा एक तरूण खेळाडू आहे. मर्यादित षटकांत फिरकीपटू म्हणून तो प्रत्येकाचा पहिला पर्याय असतोच. क्रिकेटरच्या कठोर परिश्रमामुळे चहल याला ‘आयकर विभागात’ निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like