एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

राणादा येतोय पुन्हा भेटीला! ‘तुझ्यात जीव रंगला’ नंतर आता या मराठी मालिकेत दिसणार..

झी मराठी वाहिनीवर प्रसारीत झालेली ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका प्रचंड गाजली. पैलवान गडी राणा आणि शाळेच्या शिक्षिका पाठक बाई यांची यातली प्रेमकथा बरीच गाजली. पाठक बाईंची भूमिका अक्षया देवधरने तर राणादाची भूमिका हार्दिक जोशीने केली होती.

भूमिकांव्यतिरिक्त या भूमिका साकारणाऱ्या या कलाकारांनाही लोकांनी खूप प्रेम दिले होते. आता जरी ही मालिका संपली असली तरी लोक अजूनही या मालिकेतील पात्रांची आठवण काढतात. ‘तुझ्यात जीव रंगला’ च्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सगळ्यांचा लाडका राणादा आपल्याला नव्या भूमिकेत भेटायला येणार आहे.

झी मराठी वाहिनीवर सध्या अनेक नवीन मालिका येत आहेत. त्यामध्ये एक मालिका आहे ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’. या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला. यामध्ये आपल्याला अभिनेत्री अमृता पवार आपल्या नव्या संसाराची तयारी करताना दिसत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

अमृता पवार या मालिकेत प्रमुख भूमिका निभावणार आहे. तिच्याबरोबर प्रमुख भूमिकेत अजून कोण कोण असणार हे अजून गुलदस्त्यात आहे. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार अमृता पवार बरोबर अभिनेता हार्दिक जोशी देखील प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याची बातमी येत आहे.

अजून या माहितीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले नसले तरी या गोष्टीची बरीच चर्चा होताना दिसत आहे. हार्दिक जोशीच्या चाहत्यांना या बातमीने मोठा दिलासा दिला आहे. आपला आवडता कलाकार पडद्यावर पुन्हा दिसणार या बातमीने हार्दिक जोशीच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

हार्दिकला आर्मीमध्ये आपली कारकीर्द घडवायची होती, मात्र काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही. मॉडेलिंग पासून सुरू झालेला हार्दिकचा प्रवास आता अभिनय क्षेत्रात खूप छान सुरू आहे. हार्दिकने या आधीही अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

‘जर्नी प्रेमाची’ या चित्रपटात त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती. ‘रंगा पतंगा’ या चित्रपटात हार्दिकने एसीपी पाठक ही भूमिका केली होती. झी मराठी वरील ‘अस्मिता’ आणि ‘राधा ही बावरी’ या मालिकांमध्ये देखील हार्दिकने काम केले आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘दुर्वा’, ‘स्वप्नांच्या पलीकडले’ आणि ‘क्राईम पेट्रोल’ या मालिकांमध्ये देखील त्याने भूमिका साकारल्या आहेत. ‘तुझ्यात जीव रंगला’ ने मात्र हार्दिकला खरी प्रसिद्धी मिळवून दिली. आता नव्या मालिकेत हार्दिकची भूमिका नेमकी कशी असणार आहे, हे पाहणे मनोरंजक ठरेल.

You might also like