एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

जुडवा, जुदाई मधील हा बाल कलाकार आता झाला इतका मोठा, आहे एक प्रसिद्ध..

तुम्हा सर्वाना ‘छोटा बच्चा जान के ना कोई आंख दिखाना रे… टुपी-टुपी टप-टप’ हे गाणं आठवतंच असेल. ९०च्या दशकाच्या ‘मासूम’ चित्रपटाचे हे गाणे आजही सर्वांचा मुखात आहे. या चित्रपटात एक लहान मुलगा हि होता ज्याच्या पात्राचे नाव ‘किशन’ आहे, हे गाणे त्याच मुलावर चित्रित करण्यात आले आहे. हा बाल कलाकार त्या काळात खूप लोकप्रिय झाला होता. पण आता इतक्या वर्षांनी हा बालकलाकार आता खूप मोठा झाला आहे. पण आता तो कुठे आहे आणि काय करतो कोणाला माहित आहे का?

वास्तविक आम्ही बोलत आहोत बाल अभिनेता ओंकार कपूर बद्दल. ९०च्या दशकामध्ये ओंकारने अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकाराची भूमिका केली आहे. ‘जुडवा’ मध्ये तो सर्वात लहान सलमानची भूमिका साकारत होता आणि ‘हीरो नंबर -1’ मध्ये तो गोविंदासमवेत दिसला होता. त्यानंतर त्याने ‘जुदाई’ चित्रपटामध्ये हि काम केले आहे. या चित्रपटामध्ये त्याने अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या मुलाचा अभिनय केला होता. मेला’ आणि ‘इंटरनेशनल खिलाड़ी’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसल्यानंतर ओंकार अचानक गायब झाला.

२०१५ मध्ये तो प्यार का ‘पंचनामा २’ या त्रपटात दिसला होता. परंतु या चित्रपटातून लोक त्याला पटकन ओळखू शकले नाहीत. त्याला नेहमी अभिनय क्षेत्रामध्ये आवड होती म्हणून तो सारखा ऑडिशन देखील देत राहिला. या ऑडिशनमुळे त्याला दिग्दर्शक लव रंजनचा फोन आला आणि त्यांची निवड ‘प्यार का पंचनामा -2’ साठी झाली. या चित्रपटातील त्यांच्या कामाचे खूप कौतुक झाले होते.

एवढेच नाही तर चित्रपटामध्ये वापसी करून त्याने आपले शिक्षण हि पूर्ण केले आहे. त्याने सहायक संचालक संजय लीला भन्साळी, फराह खान आणि अहमद खान यांच्यासोबतही काम केले आहे.

सुहेल खानच्या पुढील अनाम चित्रपटामध्ये तो दिसणार असल्याचे वृत्त आहे. चित्रपटाची कथा एका हिंदू मुलाची आणि एका मुस्लिम मुलीच्या प्रेमकथेवर आधारित असेल. हा चित्रपट हॉलिवूड चित्रपटाच्या ‘माय बिग फॅट ग्रीक वेडिंग’ या कथेवरती आधारित आहे. या चित्रपटात प्रथम पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याच्याविषयी बोलले जात होते पण शेवटी ओंकारला या चित्रपटासाठी साइन केले गेले आहे.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like