एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

ऑलिम्पिकचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राचे महाराष्ट्राशी आहे ‘हे’ नाते..

नीरज चोप्राचे महाराष्ट्र्र कनेक्शन तुम्हाला माहित आहे का?

ऑलिम्पिक २०२० सुरू झाले आणि भारताच्या पदकांच्या आशाही वाढत गेल्या. रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केल्यानंतर वेध लागले ते सुवर्णपदकाचे. ते स्वप्नदेखील भालाफेकपटू नीरज चोप्राने पूर्ण केले. पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत नीरजने इतिहास घडवला. अंतिम फेरीत पहिल्याच प्रयत्नात नीरजने ८७.०३ मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटर भालाफेक करत सुवर्णपदक पटकावले.

नीरजने या आधी आशियाई खेळ, राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ, जागतिक कनिष्ठ स्पर्धा यांसारख्या स्पर्धांमध्ये भाग घेत सुवर्णपदके जिंकली आहेत. भालाफेक हा तंत्र कौशल्यावर आधारीत खेळ आहे. आपले तंत्र कौशल्य सुधारण्यासाठी नीरजने जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणानंतर नीरजच्या खेळामध्ये सातत्य राहिले आहे.

अशा या गोल्डन बॉयचे मराठी मातीशीही संबंध आहेत. नीरजने ‘हिंदुस्तान टाइम्स’ ला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत याचा उल्लेख आहे. नीरज चोप्रा हा रोड मराठा आहे. काही शतकांआधी नीरजचे पूर्वज हरियाणामध्ये स्थलांतरीत झाले.

बाजीराव पेशव्यांनी लढलेल्या तिसऱ्या पानिपतच्या युद्धात त्यांनी भाग घेतला होता. नीरज याच रोड मराठ्यांचा वंशज आहे. भालाफेक या आपल्या पूर्वापार चालत आलेल्या कौशल्याचा पुरेपूर उपयोग करून घेत नीरज आपली ही परंपरा आपल्या खेळाद्वारे पुढे नेत आहे.

नीरजच्या या सुवर्णपदकाची अजून एक खासियत आहे. ट्रॅक अँड फिल्ड्स म्हणजेच ऍथलेटीक्स खेळ हे ऑलिम्पिकचे प्रमुख आकर्षण असते. मात्र स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताला ऍथलेटीक्स प्रकारात एकही पदक मिळालेलं नाही. या आधी ब्रिटीशव्याप्त भारताकडून खेळत असलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९०० च्या ऑलिम्पिकमध्ये ऍथलेटीक्स प्रकारात दोन पदके जिंकली होती, पण नॉर्मन प्रिचर्ड हे ब्रिटीश होते. त्यामुळे तब्बल १२१ वर्षांनंतर भारतभूमीवर ऍथलेटीक्स प्रकारात पदकस्पर्श झाला आहे.

भालाफेकमध्ये चेक रिपब्लिकच्या वडलेज आणि वेसेली ने अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदके जिंकली. अंतिम फेरीच्या पात्रता फेरीसाठी भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम यांच्यात लढत झाली होती. अंतिम सामन्यात नदीमला (८४.६२ मीटर) पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

चौथ्या स्थानावर जर्मनीचा जोहान्स वेटर (८५.३० मीटर) आहे. नीरजचे हे सुवर्णपदक भारताचे या वर्षीच्या ऑलिम्पिकमधले पहिलेवहिले सुवर्णपदक आहे. त्यामुळे देखील हे यश भारतासाठी खास आहे. गोल्डन बॉय नीरजची कामगिरी अशीच उंचावत राहू दे आणि त्याला अनेक पदके मिळू देत.

You might also like