एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील मायाचे ग्लॅ’म’रस फोटो पाहून चाहते घायाळ! पाहा रुचिराचा बिनधास्त अंदाज..

झी मराठी वाहिनी वरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या प्रसिद्ध मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव. तिने या मालिकेत माया हे पात्र साकारले होते. काही काळापुरतेच जरी हे पात्र मालिकेत असले तरी ते खूप लोकप्रिय झाले होते. त्यामुळे रुचिराला एक नवी ओळख मिळाली. अलीकडेच तिने आपले काही फोटो सोशल मीडिया वर शेअर केले आहेत. या फोटोंमुळे अर्थातच तिचे सगळे चाहते घायाळ झाले आहेत. तिचा हा बोल्ड आणि ग्लॅ’म’रस अंदाज पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.

रुचिरा जाधव सोशल मीडिया वर खूप सक्रीय आहे. आपले विविध फोटोशूटचे फोटो आणि काही मजेशीर व्हिडिओ देखील ती सोशल मीडिया वर शेअर करत असते. तिच्या सगळ्याच फोटो आणि व्हिडिओला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळतं. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडिया वर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. तिचे हे बो’ल्ड फोटो कोणत्याही मॉडर्न आऊटफिट मधले नाहीयेत. तर ते आहेत चक्क साडीमधील. या साडीमध्ये ती खूपच सुंदर, बो’ल्ड आणि ग्लॅ’म’रस दिसते आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ruchira Jadhav (@ruchira_rj)

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत गुरुनाथच्या प्रेमात पडलेली आणि बिझनेसचे अनुभूत कौशल्य बाळगलेली माया रुचिराने खूप बखुबीने साकारली होती. त्याआधी रुचिराने ‘सोबत’ (२००८) या चित्रपटात काम केलेले आहे. आपल्या ‘बाबू’ या आगामी चित्रपटासाठी ती बरीच मेहनत घेत असल्याचे कळते. या चित्रपटासाठी ती आगरी भाषाही शिकत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ruchira Jadhav (@ruchira_rj)

रुचिराने मराठी वेब सिरीज मध्ये देखील कामे केली आहेत. माझ्या मित्राची ग’र्ल’फ्रेंड, एफओएमओ, बंच ऑफ रेड रोझेस या तिच्या काही गाजलेल्या वेब सिरीज आहेत. अभिनयाबरोबरच रुचिराला योगा आणि स्केचिंगची खूप आवड आहे. फिटनेस फ्रीक असलेली रुचिरा कधीच आपला योगा चुकवत नाही. वेळ मिळेल तेव्हा ती आपला स्केचिंगचा छंद जोपासत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ruchira Jadhav (@ruchira_rj)

२०१२ साली सकाळ करंडकमध्ये मध्ये तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट लेखिका असे पुरस्कार मिळाले आहेत. कलर्स मराठी वाहिनी वरील ‘तुझ्यावाचून करमेना’ (२०१२) या मालिकेद्वारे तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर तिने बे दुणे दहा, माझे पती सौभाग्यवती आणि प्रेम हे सारख्या मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केला आहे.

मित्रांनो, तुम्हाला रुचिराचा हा ग्लॅ’म’रस अंदाज आवडला का? तसेच, ती अभिनेत्री म्हणून तुम्हाला कशी वाटते, हे आम्हाला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका.

You might also like