एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘घर संसार’ चित्रपटातील ही नायिका आता दिसते अशी! नवरा देखील आहे यशस्वी अभिनेता..

१९९८ ला प्रदर्शित झालेला चित्रपट ‘घर संसार’ आजही लोकांच्या लक्षात आहे. निशिगंधा वाड, दिपक देऊळकर, उदय टिकेकर, रुपाली देसाई, नयना आपटे, सुधीर जोशी अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात होती. यामध्ये उदय टिकेकर यांच्या पत्नीची म्हणजेच सुमनची भूमिका साकारली होती रुपाली देसाई यांनी. रुपाली देसाई यांनी अनेक नाटक आणि चित्रपटांतून कामे केली आहेत.

सध्या त्या चित्रपट व नाटकांतून दिसत नसल्या तरी त्या आता एका वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या क्षेत्रात त्यांनी आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रुपाली देसाई यांचं पूर्वाश्रमीचं नाव आहे रुपाली वैद्य.

रुपाली यांना नृत्याची आवड असून सध्या त्या याच क्षेत्रात काम करत आहेत. रुपाली लहानपणापासूनच नृत्याचे धडे गिरवत आहेत. त्या कथ्थक विशारद असून त्यांनी बीए एलएलबी पदवी देखील मिळवलेली आहे.

प्रसार भारतीतर्फे वर्गीकृत केलेल्या आर्टिस्ट्स मध्ये रुपाली यांचं नाव आहे. त्यांना दिल्ली श्रीनगरमणी हा पुरस्कार देखील मिळालेला आहे. अभिनय क्षेत्रापासून लांब असल्या तरी त्यांनी आपली नृत्याची आवड जपली आहे. सध्या त्या अनेक मंचांवर आपली ही नृत्यकला सादर करत असताना दिसतात. त्यांची स्वतःची ‘संस्कृती नृत्य कला मंदिर’ ही डान्स अकॅडमी देखील आहे.

आपल्या सुरुवातीच्या काळात रुपाली यांनी आदेश बांदेकर यांच्याबरोबर दूरदर्शन वरील ‘ताक धिना धिन’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. देव नवरी, असेच आम्ही सारे, श्री तशी सौ, उंच माझा झोका गं, अनोळखी ओळख, झालं एकदाचं यांसारख्या नाट्यकृतींतूनही त्यांनी कामे केली आहेत. या नाटकांमधून त्यांना नयना आपटे, सुधीर जोशी, स्मिता तळवलकर, अशोक सराफ यांसारख्या दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी मिळाली.

रुपाली देसाई यांचे पती श्रीकांत देसाई हेदेखील अभिनेते आहेत. श्रीकांत गेली ३४ वर्षे मराठी इंडस्ट्री मध्ये कार्यरत आहेत. अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून त्यांनी सहाय्यक, चरित्र तसेच खलनायकाच्या भूमिका निभावल्या आहेत. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत त्यांनी मुघल सरदाराची भूमिका केली होती.

रुपाली व श्रीकांत यांना दिशा नावाची मुलगी असून तिने आपल्या आईच्या हाताखाली अडीच वर्षांची असल्यापासूनच नृत्याचे धडे गिरवायला सुरुवात केली. तिने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून विशारद पूर्ण केले आहे. तिने मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात कथ्थक नृत्य मुंबई विभागातून सुवर्णपदक पटकावले आहे, तर नृत्य क्षेत्रात अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘मेनका ट्रॉफी’ ची देखील ती मानकरी आहे.

You might also like