एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

दुःखद! ‘तारक मेहता का…’ मधील नटू काकांनी घेतला निरोप! वयाच्या ७७ व्या वर्षी नि’धन…

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका सगळ्यांचीच आवडती मालिका आहे. दोन घटका मनोरंजन करण्यासाठी ही मालिका म्हणजे सगळ्यांची पहिली पसंती आहे. मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देण्यातही ही मालिका अग्रेसर आहे. मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. सगळ्याच व्यक्तिरेखांचे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान आहे. यातीलच एक व्यक्तिरेखा म्हणजे गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काम करणारे नटू काका.

जेठालाल गडा यांच्या इलेक्ट्रॉनिक्स शॉप मध्ये काम करणारे नटू काका हे अतिशय विनोदी पात्र आहे. ते जरी जेठालालच्या हाताखाली काम करत असले तरी जेठालाल त्यांचा नेहमी आदर करतो. त्यांना आपल्या वडिलांसारखा मानतो. गोकुलधाम सोसायटीमध्येही त्यांना खूप आदराने आणि मानाने वागवले जाते. आपल्याला हवे तसे जेठालाल कडून वदवून घेणारे, हवी तेव्हा सुट्टी घेणारे, पण आपल्या कामात चोख असलेले नटू काका सगळ्यांचेच आवडते आहेत.

मात्र सगळ्यांच्या या लाडक्या नटू काकांनी अचानकच एक्झिट घेतली आहे. ही एक्झिट मालिकेतील नसून त्यांच्या खऱ्या आयुष्यातील आहे. ही मजेशीर भूमिका साकारली होती अभिनेते घनश्याम नायक यांनी. १२ मे १९४५ रोजी त्यांचा जन्म झाला होता. बराच काळ ते कर्क’रो’गाशी झुंज देत होते. अखेर त्यांची ही झुंज संपवत मृ’त्यूने त्यांच्यावर विजय मिळवला आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला.

या मालिकेव्यतिरिक्त त्यांनी अनेक हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ते मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर तालुक्यामधील धांधई गावचे होते. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांनी काही ठिकाणी बालकलाकार म्हणूनही काम केले होते. जेव्हा त्यांना क’र्क’रोगाचे निदान झाले, तेव्हा प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांचा मुलगा विकासने सांगितले होते, की “बाबा चांगले आहेत. पूर्वीपेक्षा बरेच चांगले आहेत, परंतु आता त्यांना विश्रांतीची गरज आहे. ते शो शूट करू शकत नाहीत. पण याचा अर्थ हा नाही की त्यांनी शूटिंग पूर्णपणे थांबवले आहे.”

घनश्याम नायक यांच्या फॅन क्लबने नुकतेच दोन फोटो शेअर केले आहेत. हे त्यांचे अलीकडच्या काळातले फोटो आहेत असे यात नमूद केले आहे. यामध्ये त्यांचे वजन बरेच घटलेले दिसून येते. तसेच त्यांचे तोंड देखील एका बाजूने वाकडे झालेले या फोटोत दिसत आहे. आजारपणामुळे त्यांच्या शेवटच्या दिवसांत त्यांची तब्येत बरीच खालावल्याने दिसते.

You might also like