एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘देवमाणूस’ मधील ही अभिनेत्री दिसणार आता नव्या भूमिकेत! जाणून घ्या या अभिनेत्रीबद्दल..

१५ ऑगस्ट ला ‘देवमाणूस’ ही मालिका संपली आणि प्रेक्षकांनी हळहळ व्यक्त केली. त्यांची आवडती मालिका संपल्याने प्रेक्षक या मालिकेतील कलाकारांना मिस करत आहेत. मालिका संपली तरी मालिकेतील कलाकारांच्या सोशल मीडिया अकाऊंट ला प्रेक्षक फॉलो करत आहेत आणि हे कलाकार आता कोणत्या नवीन प्रोजेक्ट मध्ये दिसतील याची वाट पहात आहेत. ‘देवमाणूस’ मालिकेतील सगळेच कलाकार प्रेक्षकांच्या आवडीचे बनले होते.

नुकताच ‘देवमाणूस’ ची भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाडने त्याच्या नवीन प्रोजेक्टची माहिती त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट वरून दिली होती. या नव्या प्रोजेक्ट मध्ये तो एका फौजीची भूमिका साकारणार आहे. तसेच या प्रोजेक्ट मध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान देखील काम करणार असल्याची चर्चा आहे. आपल्या आवडत्या कलाकाराला पुन्हा एकदा पाहताना प्रेक्षकांना नक्कीच आनंद होणार आहे.

‘देवमाणूस’ मालिकेतील अजून एक कलाकार नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. मात्र ती छोट्या पडद्यावर भेटायला येत नसून एका ओटीटी प्लॅटफॉर्म वर काम करत आहे. ‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्म वर एक नवीन वेब सिरीज प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

३१ ऑगस्ट पासून ही नवीन वेब सिरीज प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या वेब सिरीजचे नाव आहे ‘परीस’. या वेब सिरीजद्वारे अभिनेत्री गायत्री बनसोडे ‘नंदा’ च्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटायला येत आहे. ‘देवमाणूस’ मालिकेत तिने ‘रेश्मा’ ची भूमिका साकारली होती.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gayatri Bansode (@gayatri0810_official)

गायत्रीने या आधी ‘काल’ (२०२०) आणि ‘खत का आनंद’ या शॉर्ट फिल्म्स मध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘गायीच्या शापाने’ या नाटकात देखील भूमिका साकारली आहे. गायत्रीला पुन्हा एकदा अभिनय करताना बघताना तिच्या चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे.

ती सोशल मीडिया वर बरीच सक्रीय असल्याने नेहमी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडिओ ती नियमितपणे सोशल मीडिया वर अपलोड करताना दिसते. ‘मराठी कॉमेडी पार्टी’ या यूट्यूब चॅनेल वर ती आपल्याला कॉमेडी करतानाही दिसते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by One Cam Productions🎬 (@one_cam_productions)

गायत्री काम करत असलेली वेब सिरीज ‘परीस’ ही एक गूढकथा आहे. एका अं’ध’श्र’द्धेमुळे गावातील लोक परीसाच्या शोधात निघतात आणि मग एक अकल्पित खेळ सुरू होतो, अशी साधारण या वेब सिरीज ची रूपरेखा आहे. या वेब सिरीज ची निर्मिती वन कॅम प्रॉडक्शन्स ने केली आहे. या वेब सिरीज ची कथा मयूर करंबळीकर यांनी लिहिली आहे.

You might also like