एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अभिनयाबरोबरच हे गुणही आहेत अंगात! शरद केळकरने बनवला १० मिनिटात गणपती..विडिओ झाला

कलेचा अधिपती गणपती बाप्पाचा उत्सव सध्या सुरू आहे. या उत्सवात सगळ्यांनाच सगळ्याच गोष्टींचा उत्साह असतो. गणपतीची आरास, नैवेद्य, मोदक, धमाल या सगळ्या गोष्टींची तयारी खूप आधीपासून सुरू होते. पण त्याआधीही असते बाप्पाची तयारी. बाप्पाला आकार देण्यापासून तिला प्रतिष्ठापना करता येईल अशा रूपात आणणं हे अत्यंत कौशल्याचं काम आहे. हल्ली पर्यावरणपूरक गणपती मूर्तीचं प्रस्थ वाढत आहे. अशा वेळी हे मूर्ती घडवण्याचं कौशल्याचं काम काही लोक घरीच करू लागले आहेत.

आपल्या हाताने आपला बाप्पा बनवण्याचा आनंद काही औरच! शाडूची माती वापरून पर्यावरणपूरक गणपती बनवता येतो आणि आपला बाप्पा आपणच बनवला याचं सुखही अनुभवता येतं. असाच आनंद यावर्षी घेतला एका कलाकाराने. अभिनेता शरद केळकरने अवघ्या १० मिनिटांत आपला बाप्पा बनवला. शरद केळकर त्याच्या दमदार आवाजासाठी ओळखला जातो. मात्र अभिनयाबरोबरच काही इतरही गुण त्याच्यात पाहायला मिळतात.

शरद केळकरने शाडूच्या मातीपासून केवळ १० मिनिटांत बाप्पाची छोटीशी मूर्ती तयार केली. यासाठी त्याला क्ले आर्टिस्ट शुभंकर कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. शाडू मातीच्या छोट्याशा ब्लॉक पासून सोप्या पद्धतीने रेखीव मूर्ती बनवण्याची पद्धत यावेळी त्यांनी दाखवली. तसेच शाडू मातीच्या मूर्तीला रंगकाम कसे करायचे यावरही त्यांनी मार्गदर्शन केलेले पाहायला मिळाले. शरदचा स्वतःच्या हाताने मूर्ती बनवण्याचा हा जरी पहिलाच प्रयत्न असला तरी त्याने खूप सुंदर मूर्ती घडवलेली पाहायला मिळाली. शरदचा हा गणपती बनवतानाचा व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे.

शरद केळकरने आपल्या विविध प्रकारच्या भूमिकांद्वारे आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात त्याने शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. ‘बाहुबली’ चित्रपटाच्या हिंदी डबिंग मध्ये त्याने बाहुबली या बहुचर्चित पात्राला आपला आवाज दिला होता. त्याने आजपर्यंत अनेक चित्रपट, मालिका आणि वेब सिरीज मध्ये काम केले आहे. हिंदी बरोबरच त्याने मराठी, कन्नड, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये देखील काम केले आहे.

त्याचा हा गणपती बाप्पाची मूर्ती बनवतानाचा व्हिडिओ पाहून अभिनयाबरोबरच त्याच्याकडे अजूनही अनेक गुण आहेत, हे दिसून येतं. आपल्या मार्गदर्शकांकडून लगेच एखादी नवी कला आत्मसात करून घेण्याची त्याची वृत्ती त्याच्यातील नवीन काहीतरी शिकून घेण्याच्या स्वभावाचे प्रतीक आहे. बाप्पा त्याच्या कामात त्याला नेहमी यश देवो आणि त्याच्या आयुष्यात भरभराट करो, हीच प्रार्थना!

You might also like