एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘गाढवाचं लग्न’ मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते अशी…फोटो पाहून विश्वास बसणार नाही

एव्हरग्रीन मराठी चित्रपटांमधलं एक नाव म्हणजे ‘गाढवाचं लग्न’. यातल्या व्यक्तिरेखांनी महाराष्ट्राला पोट धरून हसायला लावलं. गाढवाच्या लग्नाची ही काल्पनिक कथा लोकांनी डोक्यावर घेतली. यात काम करणारे कलाकार आजही लोकांच्या लक्षात आहेत. मकरंद अनासपुरेचा सावळ्या कुंभार लोकांनी जेवढा डोक्यावर घेतला, तेवढीच लक्षणीय भूमिका निभावली गंगीने म्हणजेच राजश्री लांडगेने. मकरंद अनासपुरेच्या तोडीस तोड अभिनय करणं हे तसं अवघड काम. त्यात पण त्यांचं विनोदाचं टायमिंग पकडत त्यांच्या तोडीस तोड काम करणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. पण ‘गाढवाचं लग्न’ या चित्रपटात राजश्रीने ही भूमिका खूप सहज निभावली आहे.

सावळ्या कुंभाराची बायको गंगी म्हणजे तिखट प्रकरण. तिखट बोलणं, शाब्दिक कोट्या करणं आणि आपल्या हावभावांनी प्रत्येक प्रसंगाला खुमारी आणणं हे गंगीचे काही विशेष गुणधर्म. या सगळ्या गुणधर्मांना आपल्या अभिनयाने जिवंत केले ते राजश्री लांडगेने. ‘गाढवाचं लग्न’ करण्याआधीही राजश्रीने अनेक चित्रपट केले आहेत. पण या चित्रपटाने तिला घराघरांत पोचवले. या चित्रपटात तिने गावरान बाईची भूमिका निभावली आहे. कपड्यांपासून मेकअप पर्यंत आणि बोलण्यापासून वागण्यापर्यंत सगळ्यात गंगीचा गावरणपणा उठून दिसला.

खऱ्या आयुष्यात मात्र राजश्री खूपच मॉडर्न आहे. ‘गाढवाचं लग्न’ नंतर राजश्रीचा ‘सिटीझन’ हा चित्रपटदेखील प्रसिद्ध झाला. यामध्ये तिची व्यक्तिरेखा गंगीच्या अगदी विरुद्ध म्हणजे मॉडर्न पद्धतीची होती. प्रेक्षकांनी तिच्या ‘राजश्री राजेशिर्के’ या व्यक्तिरेखेचं देखील खूप कौतुक केलं.

अर्थातच या चित्रपटातला तिचा लूक हा प्रेक्षकांसाठी सुखद धक्का होता. राजश्रीने अनेक बड्या कलाकारांसोबत या चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे. पण तिने आपली व्यक्तिरेखा खूप आत्मविश्वासाने निभावली आहे. अभिनयाबरोबरच तिचा या चित्रपटाच्या निर्मितीतही सहभाग होता. राजश्री खूप निवडक चित्रपट करते.

राजश्री फारशी सोशल मीडिया वर सक्रिय नव्हती. लॉकडाऊनच्या काळात मात्र जसा वेळ मिळेल तसं ती सोशल मीडिया द्वारे आपल्या चाहत्यांच्या भेटीला येऊ लागली. तिचे मॉडर्न फोटो बघून चाहतेदेखील तिचे खूप कौतुक करतात. सध्या ती सोशल मीडिया वर आपले पारंपारिक आणि आधुनिक वेशातले फोटो शेअर करत चाहत्यांकडून वाहवा मिळवत असते.

अभिनयातली ही राजश्री आपले सामाजिक भानही राखून आहे. तिने महाराष्ट्र शासनाच्या ‘जलयुक्त शिवार’ योजनेसाठी मदत केली आहे. सामाजिक प्रश्नांसाठी काम करणं, त्यासाठी मदत करणं या गोष्टीदेखील राजश्री जबाबदारीने पार पाडते.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like