एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अबब! एवढी फी आहे या स्टार्सच्या मुलांच्या शाळेची! या शाळेत जातात ही मुले…

बॉलिवूड सेलिब्रेटी अगदी स्वप्नवत आयुष्य जगतात. त्यांना मिळणारी प्रसिद्धी, पैसे याबद्दल सामान्य माणसाला नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. अशा कलाकारांची जीवनशैली, त्यांच्या कुटुंबाची जीवनशैली, त्यांची मुले, त्यांच्या शाळा किंवा कॉलेजेस याबद्दल लोकांना नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. बॉलिवूड कलाकारांच्या जीवनशैलीविषयीची माहिती बऱ्याचदा वाचनात येते. मात्र त्यांच्या मुलांबद्दल किंवा मुलांच्या जीवनशैलीबद्दल फारशी माहिती मिळत नाही.

बऱ्याच प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांची मुले अजून शाळेत जातात. आश्चर्य म्हणजे बऱ्याच बॉलिवूड स्टार्सची मुले एकाच शाळेत आहेत. ही शाळा आहे मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल. या शाळेची स्थापना २००३ मध्ये करण्यात आली. या शाळेचे संपूर्ण कामकाज नीता अंबानी पाहतात.

शाळा प्रशासक म्हणून नीता यांनी खूप छान काम केलेले पाहायला मिळते. या शाळेची इमारत ७ मजली असून ही शाळा वांद्रे (पूर्व) मधील बीकेसी कॉम्प्लेक्स मध्ये आहे. या शाळेत केवळ बॉलिवूड स्टार्सचीच नाही, तर वेगवेगळ्या क्रिकेटपटू, इतर सेलिब्रेटी आणि उद्योगपतींची मुलेदेखील इथे शिकतात.

वेगवेगळ्या सेलिब्रेटींची मुले या शाळेत शिकायला येत असल्याने शाळेची व्यवस्था अगदी चोख राखलेली आहे. इथे सुरक्षितता असल्याने स्टार किड्स या शाळेत शिकायला येतात. ही शाळा बॉलिवूड सेलिब्रेटींची आवडती शाळा आहे, असे म्हणायला हरकत नाही.

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या याच शाळेत शिकते. शाळेच्या वार्षिक संमेलनाला ऐश्वर्या, अभिषेक आणि जया बच्चन यांनी हजेरी लावली होती. शाहरुख खानचा मुलगा अब्राम देखील याच शाळेत शिकायला आहे. त्यामुळे वेळात वेळ काढून शाहरुख देखील या संमेलनाला आला होता.

या शाळेत आमीर खानचा मुलगा आझाद राव खान, तसेच हृतिक रोशनची मुले रिहान आणि रिदान सुद्धा याच शाळेत शिकतात. प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुले सारा आणि अर्जुन देखील या शाळेचे विद्यार्थी आहेत. इथे मोठमोठ्या सेलिब्रेटींची मुले शिकायला येत असल्याने या शाळेची फी देखील तितकीच तगडी आहे.

केजी ते सातवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना साधारण १ लाख ७० हजार रुपये, तर आठवी ते दहावीच्या (आयसीएसई बोर्ड) विद्यार्थ्यांना १ लाख ८५ हजार रुपये इतकी फी आहे. आठवी ते दहावीच्या (आयजीसीएसई बोर्ड) विद्यार्थ्यांना ४ लाख ४८ हजार रुपये फी आहे. येथील प्रवेशशुल्क साधारण २४ लाख रुपये आहे.

You might also like