एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

फँड्री चित्रपटामधील जब्या आता इतक्या वर्षानंतर दिसतोय असा, सध्या करतोय हे काम..पहा

२०१३ साली प्रदर्शित झालेला फँड्री हा चित्रपट तुमच्या लक्षात असेलच. हा चित्रपट नागराज मंजूळे यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाने बॉक्स अॉफिसवर तुफान गल्ला जमवला होता. त्याचबरोबर या सिनेमाला अनेक पुरस्कारही प्राप्त झाले.

या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला जब्या आजही अनेकांच्या लक्षात आहे. पण फँड्रीनंतर त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. पण आता त्याच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपणार नाही. लवकरच त्यांना त्यांच्या लाडक्या फँड्रीचा नवा अंदाज नवीन चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

फँड्री या चित्रपटातील जब्या म्हणजेच सोमनाथ अवघडे हा अभिनेता होय. सोमनाथ अवघडे सोबत फँड्रीमधे राजेश्वरी खरात ही अभिनेत्री काम करताना दिसली होती. फँड्री या चित्रपटातील भूमिकेसाठी सोमनाथ अवघडे याला चक्क राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. इतकेच नाही तर प्रसिद्ध अभिनेता आमीर खानही फँड्रीच्या प्रेमात पडला.

त्याने आवर्जून सोमनाथची भेटही घेतली आणि त्याचे भरभरून कौतुकसुद्धा केले. फँड्री हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीसाठी मैलाचा दगड ठरला. यात मंजूळे यांनी मांडलेले सामाजिक वास्तव हेलावून टाकणारे होते. समाजाने नाकारलेल्या लोकांच्या आयुष्यावर या चित्रपटाने अगदी परखड भाष्य केले. या चित्रपटात सोमनाथनेही अप्रतिम अभिनय केला.

खरेतर फँड्रीसाठी सोमनाथला जेंव्हा विचारण्यात आले होते तेंव्हा त्याने या भूमिकेला नकार दिला होता. पण त्याला मनवण्यासाठी अनेक लोक येत गेले. लोक त्याला भेटायला आले की तो पळून जायचा आणि टाकीवर लपून काय चाललय हे पाहत बसायचा. त्याला लोकांची धावपळ बघवली नाही आणि तो अखेर या भूमिकेसाठी राजी झाला. पण त्यानंतर त्याने जे काम केले त्याबद्दल कितीही बोलले तरी कमीच आहे.

या चित्रपटानंतर गेल्या अनेक वर्षात सोमनाथमधे अनेक बदल झाले. हाच अपडेटेड सोमनाथ तुम्ही खालील फोटोमधे पाहू शकता. या फोटोत सोमनाथ हा अत्यंत डॅशिंग दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावरसुद्धा एक आत्मविश्वास झळकत आहे.

नुकतीच “फ्री हिट दणका” या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा झाली आहे. या चित्रपटाची निर्मिती अतुल तरडे, आकाश ठोंबरे आणि मेघनाथ सोरखडे यांनी केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन या सुनिल मगरे यांनी केले आहे.

या चित्रपटात सैराट फेम आकाश ठोसरच्या मित्रांच्या भूमिकेत असलेले तानाजी गुळगुंडे आणि अरबाज सल्या हे दोघेही प्रेक्षकांना परत एकदा नवीन भूमिकांमधे काम करताना दिसणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच चित्रपटात आपला लाडका जब्या अर्थात सोमनाथ अवघडे हा गुणी अभिनेता परत एकदा मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

ही जब्याच्या समस्त चाहतावर्गासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. हा चित्रपट बॉक्स अॉफिसवर तुफान चालणार यात तीळमात्रही शंका नाही.

हा सिनेमा येत्या १६ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. जब्याला पाहण्यासाठी सर्वच जण खूप उत्सुक आहेत. यात त्याच्या लूकमधे आणि अभिनयामधे झालेला बदल पाहणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. तर सोमनाथला त्याच्या या आगामी चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा! नवनवीन अपडेट्ससाठी हा लेख तुमच्या जास्तीत मित्रांपर्यंत पोहचता करा.

You might also like