एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘एसीपी प्रद्युम्न’ अर्थात शिवाजी साटम यांची फॅमिली आहे इंडस्ट्री मधील, मुलगा आहे हा अभिनेता, मुलगी आहे ही अभिनेत्री नाव ऐकून थक्क व्हाल..

छोट्या स्क्रिनच्या माध्यमातुन घरोघरी पोहोचलेले, व विशेषतः तरुणाईला वेड लावणारे कॅरेक्टर अर्थात ‘एसीपी प्रद्युम्न’. ही भूमिका प्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम यांनी केली होती. ‘सीआयडी’ नावाच्या शो मधुन ते हे कॅरेक्टर करत असत.

या कॅरेक्टरचे, “दया, तोड दो दरवाजा” आणि “कुछ तो गडबड है दया” हे डायलॉग प्रचंड गाजले. शिवाय तितक्याच ताकदीने आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर शिवाजी साटम यांनी सहजतेने ती भूमिका केली होती. आज आपण यांचा मुलगा आणि सुन यांच्याविषयी जाणून घेणार आहोत.

चित्रपटसृष्टीतील बऱ्याच कलाकार मंडळींची मुलं ही सुद्धा चित्रपट क्षेत्रात कार्यरत असताना आपण पाहिलं आहे. काही अपवाद मंडळींची मुले वेगळ्या क्षेत्रात गेलेली पाहायला मिळतात. शिवाजी साटम यांना आपले वैयक्तिक आयुष्य रसिकांसमोर उलगडून दाखवायला आवडत नाही.

याच कारणाने त्यांच्या मुलांविषयी सहसा कोणाला माहित नाही. शिवाजी साटम हे एक उत्तम अभिनेते आहेत. त्यांच्याप्रमाणेच त्यांचा मुलगा म्हणजे अभिजीत साटम हा सुद्धा अभिनेता आहे. ही गोष्ट फार कमी लोकांना ठाऊक आहे.

बऱ्याचदा बाॅलिवुड मधल्या एका कुटुंबातील बहुतांश व्यक्ती या सिनेसृष्टीत काम करताना पाहायला मिळतात. अगदी असंच काहीस या साटम कुटुंबाबाबतीतही आहे. शिवाजी साटम यांची सुन अर्थात अभिजीत साटम याची बायकोही अभिनेत्री आहे. मधुरा वेलणकर असे तिचे नाव आहे.

तिने बऱ्याच मालिका, चित्रपटांमधून आपल्या अभिनय सादर केलेला आहे. इंडस्ट्रीतील एक सुप्रसिद्ध अभिनेते प्रदीप वेलणकर यांची कन्या मधुरा वेलणकर आहे. तिचा अभिजीत साटम याच्याशी विवाह झाल्याने प्रदीप वेलणकर व शिवाजी साटम हे नात्याने एकमेकांचे व्याही बनलेले आहेत.

शिवाजी साटम यांनी मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांमधून तसेच मालिकांमधूनही बरंचसं काम केलं आहे. “सीआयडी” या मालिकेशिवाय चित्रपटांमध्ये “गर्व”, “AK ४७”, “गिल्टी” या हिंदी चित्रपटांसह “हापूस”, “दे धक्का”, “वेडिंगचा शिनेमा” हे त्यांचे काही मराठी सिनेमे आहेत.

त्यांचा मुलगा अभिजीत साटम यानेही “हथियार”, “तेरा मेरा साथ रहे” अशा काही फिल्म केल्या आहेत. आपल्या वडिलाप्रमाणेच अभिजीतही हिंदी बरोबर मराठी चित्रपटसृष्टीतही काम करतो. अभिजीत हा केवळ अभिनेता नसून तो दिग्दर्शक आणि निर्माताही आहे.

मराठीमध्ये त्याने “हापूस” हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. अभाजीतने “शतदा प्रेम करावे” या स्टार प्रवाह वाहिनीवर चाललेल्या मालिकेतही काम केलं आहे. अलीकडेच २०१८ साली “लगी तो छगी” यामधून अभिनय केला आहे. या मालिकेत तो उमेश नावाचं कॅरेक्टर करायचा. अभिजीत आता जरी चित्रपट क्षेत्रात कार्यरत असला तरी तो मूळ साॅफ्टवेअर इंजिनियर आहे.

अभाजीत आणि मधुरा यांना युवान नावाचा मुलगा आहे. मधुरा ही सोशल मिडियावर चांगलीच ॲक्टिव्ह असते. ती सतत नवनवीन फोटो अपलोड करत असते.

शिवाजी साटम यांची सुन असणारी मधुरा हिनेही बऱ्याच चित्रपट-मालिकांमधून काम केलं आहे. मधुरा ने “गुमनाम है कोई” (नाटक), “अखंड सौभाग्यवती”, “अधांतरी”, “अशाच एका बेटावर”, “मी अमृता बोलतेय”, “मेड इन चीन”, “रंगीबेरंगी”, “उलाढाल”, “एक डाव धोबीपछाड”, “कॅनवास”, “खबरदार”, “गिल्टी”, “गोजिरी”, जन गण मन”, ” नाॅट ओन्ली मिसेस राऊत”,” हापूस”,” क्षणोक्षणी” आणि” सरी वर सरी” या आणि अशा बऱ्याच प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे.

You might also like