एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘ती परत आलीये’ मुळे ‘देवमाणूस’ मालिका बंद होणार का? नव्या मालिकेच्या प्रोमोमुळे नव्या चर्चेला उधाण…

झी मराठी वाहिनी वर ‘ती परत आलीये’ मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि नव्या चर्चांना उधाण आले. १६ ऑगस्ट पासून ही मालिका झी मराठीवर रात्री १०:३० वाजता प्रसारीत होणार आहे. मात्र सध्या या वेळेत ‘देवमाणूस’ ही मालिका प्रसारीत होत आहे. नव्या मालिकेच्या प्रोमोमुळे ‘देवमाणूस’ मालिका बंद होणार का, याबद्दल प्रेक्षकांमध्ये चर्चा झडताना दिसत आहे. रात्री १०:३० च्या स्लॉट मध्ये तसेच झी मराठीवरील इतर मालिकांच्या तुलनेत ‘देवमाणूस’ चा टीआरपी सर्वांत जास्त आहे.

दिग्गज अभिनेते विजय कदम या नव्या मालिकेच्या प्रोमो मध्ये दिसत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. रात्री साडेआठ वाजता लागणारी ‘अग्गंबाई सूनबाई’ मालिका बंद होऊन त्याजागी ‘देवमाणूस’ मालिका दाखवणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

‘देवमाणूस’ मालिकेत सध्या डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंग याची अकरा खुनांच्या आरो’पातून मुक्तता झाल्याचे दाखवण्यात आले आहे. डिम्पल आणि अजितकुमारच्या लग्नाची घाई होताना दिसत आहे. मात्र मालिका इथेच संपवली तर प्रेक्षकांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे.

तसेच मालिकेत ‘तुझ्यात जीव गुंतला’ फेम ‘वहिनीसाहेब’ माधुरी पवारची देखील एन्ट्री झाली आहे. मालिकेच्या शेवटी शेवटी सहसा नव्या पात्राची एन्ट्री केली जात नाही. त्यामुळे मालिका संपण्याची शक्यता थोडी कमी होते.

झी मराठी वरील ‘कारभारी लय भारी’, ‘माझा होशील ना’ या मालिकांपेक्षा ‘देवमाणूस’ चा टीआरपी जास्त असल्याने देखील ही मालिका संपण्याची शक्यता कमी होते. यातल्या आकर्षक कथानकामुळे या मालिकेचे बरेच चाहते आहेत.

झी मराठी चा रात्री साडेदहा वाजता रहस्यमयी, थरारक मालिका दाखवण्याचा शिरस्ता आहे. त्यामुळे ‘ती परत आलीये’ साठी ‘देवमाणूस’ ची वेळ बदलण्याचीच जास्त शक्यता आहे. अशा वेळी ही मालिका खरंच प्रेक्षकांचा निरोप घेणार की नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याबाबत संभ्रम आहे.

झी मराठी वर ही स्थिती असताना दुसरीकडे कलर्स मराठी वाहिनी वर ‘बिग बॉस मराठी’ च्या तिसऱ्या सिझन ची लगबग सुरू आहे. अजून या रिऍलिटी शो च्या प्रसारणाची वेळ निश्चित नसली, तरी ती रात्री दहा किंवा त्यानंतरच असण्याची शक्यता आहे.

त्याचा फटका ‘देवमाणूस’ च्या टीआरपी ला बसू शकतो. त्यामुळे या मालिकेची वेळ बदलणे झी मराठी साठी उपयुक्त ठरू शकते. तसेच नव्या मालिकेच्या येण्याने प्रेक्षकवर्ग झी मराठी वाहिनीवरच राहील, असाही अंदाज वर्तवला जात आहे. येत्या काही दिवसांत याबद्दल काही ठोस माहिती मिळू शकेल.

You might also like