एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

डॉ. अमोल कोल्हे यांची पत्नी दिसते इतकी सुंदर! ती देखील आहे डॉक्टर…

छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की मनात केवळ अभिमान आणि आदर भरून येतो. महाराजांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं कामच असं होतं की त्यांचं नाव घेताच आपोआप मान झुकते आणि हात मुजऱ्यासाठी पुढे येतात. अशा व्यक्तीवर एखादी मालिका बनवणं म्हणजे खायचं काम नाही. मात्र हे काम २००८ मध्ये नितीन चंद्रकांत देसाई या निर्मात्याने हाती घेतलं आणि त्याला मूर्त रूप दिलं ते अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी.

अमोल कोल्हे यांनी स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘राजा शिवछत्रपती’ मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. ही भूमिका इतकी लोकप्रिय ठरली, की आजही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका म्हटलं की केवळ आणि केवळ अमोल कोल्हेच डोळ्यांसमोर येतात.

आपल्या ऐतिहासिक भूमिकांमुळे डॉ. अमोल कोल्हे हे नाव आज घराघरांत पोहोचलं आहे. ‘राजा शिवछत्रपती’ नंतर त्यांनी ‘शंभूराजे’ या नाटकात संभाजी महाराजांची भूमिका साकारली. २०१७ मध्ये झी मराठी वाहिनी वर प्रसारीत झालेल्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतही अमोल यांनी संभाजी महाराजांची भूमिका साकारली. या मालिकेच्या निर्मितीतही त्यांचा सहभाग होता. सध्या सोनी मराठी वाहिनी वर सुरू असलेल्या ‘स्वराज्य जननी जिजामाता’ मालिकेतही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.

नुकताच १८ सप्टेंबरला त्यांनी आपला ४१ वा वाढदिवस साजरा केला. अमोल कोल्हे जरी त्यांच्या ऐतिहासिक भूमिकांसाठी प्रसिद्ध असले तरी त्यांनी इतर प्रकारच्या भूमिकाही साकारल्या आहेत. स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘ओळख’ (२०१०) मालिकेत त्यांनी दुहेरी भूमिका साकारली होती, तर ईटीव्ही मराठी वाहिनी वरील ‘कालाय तस्मै नमः’ मालिकेत देखील त्यांनी काम केले आहे. आघात, ऑन ड्युटी २४ तास, अरे आवाज कुणाचा, रमा माधव, मराठी टायगर्स अशा चित्रपटांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

डॉक्टर असलेल्या अमोल कोल्हे यांच्या पत्नी देखील डॉक्टर आहेत. त्यांच्या पत्नीचं नाव अश्विनी आहे. २००७ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. अश्विनी २००९ पासून रुग्णांची सेवा करत आहेत. सध्या त्या मुंबईच्या केईम हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचे नाव रुद्र, तर मुलीचे नाव आद्या आहे. आद्याने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. यात तिने स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची मुलगी ताराची भूमिका निभावली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

You might also like