एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘सिर्फ तुम’ चित्रपटातील ही सोज्वळ अभिनेत्री आठवते का? आता दिसते अशी…

‘सत्यमेव जयते’ (२०१८) चित्रपटातील नोरा फतेहीचं ‘दिलबर’ हे गाणं तर तुम्ही पाहिलंच असेल. तिच्या बेली डान्समुळे या गाण्याला चार चाँद लागले आहेत. हे गाणं मूळचं एका जुन्या चित्रपटातील होतं. तेच पुन्हा रिप्राईज करून ‘सत्यमेव जयते’ चित्रपटात आयटम सॉंग म्हणून वापरण्यात आलं होतं. पण हे गाणं मूळचं नक्की कोणत्या चित्रपटातील आहे, हे माहीत आहे का? ते होतं ‘सिर्फ तुम’ या १९९९ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील.

हे गाणं अभिनेत्री सुश्मिता सेन वर चित्रित झालं होतं. मात्र या चित्रपटातील मुख्य नायिका कुणी वेगळीच होती. तुम्हाला ती सोज्वळ नायिका आठवते का हो? नक्कीच आठवत असणार. तिचं साधं दिसणं आणि गोड हसणं प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. त्या अभिनेत्रीचं नाव होतं प्रिया गिल. ९ डिसेंबर १९७५ रोजी जन्माला आलेल्या प्रियाने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

प्रिया गिलने १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात तिच्याबरोबर अर्शद वारसी आणि चंद्रचूड सिंग हे अभिनेते देखील होते. ‘सिर्फ तुम’ चित्रपटामुळे ती प्रसिद्धीझोतात आली. त्यानंतर तिने जोश (२०००) आणि रेड (२००२) असे हिट चित्रपट दिले. मात्र तिचे बाकीचे हिंदी चित्रपट तितकेसे यश मिळवू शकले नाहीत. श्याम घनश्याम (१९९८), बडे दिलवाला (१९९९), जितेंगे हम (२००१), एलओसी कारगिल (२००३), बॉर्डर हिंदुस्तान का (२००३), भैरवी (२००६) हे तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकले नाहीत.

हिंदी बरोबरच तिने मल्याळम, तेलगू, भोजपुरी, पंजाबी, तमिळ या भाषांमध्येही एक-एक चित्रपट केला आहे. २००२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘रेड’ हा तिचा तमिळ चित्रपट खूप हिट झाला. २००६ साली प्रदर्शित झालेला ‘भैरवी’ हा तिचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर मात्र ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. तिने त्यानंतर आपली अभिनय कारकीर्दच सोडून दिली.

खूप कमी जणांना हे माहीत आहे, की प्रिया गिल १९९५ मध्ये झालेल्या ‘मिस इंडिया’ या सौंदर्यस्पर्धेची सेकंड रनरअप होती. प्रिया गिलचा चेहरा नेहमीच प्रेक्षकांना खूप आवडला आहे. तिचा चेहरा अत्यंत निरागस आणि गोड आहे. तिच्या ‘सिर्फ तुम’ चित्रपटातील भूमिकेवर तर प्रेक्षक अजूनही प्रेम करतात. प्रियाने अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला असला, तरी आजही तिचे चाहते तिला विसरले नाहीयेत.

You might also like