एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘प्रेमासाठी वाट्टेल ते…’ मधली ही अभिनेत्री आठवते का? इतका दु’र्दैवी होता या अभिनेत्रीचा अं’त…

अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारं सत्तरच्या दशकातील व्यक्तिमत्व म्हणजे पद्मा चव्हाण. मराठी व हिंदी चित्रपट आणि मराठी नाटके या माध्यमांमध्ये काम करत त्यांनी प्रेक्षकांना आपलेसे केले. तुम्हाला माहीत आहे का, की पद्मा यांना लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड होती? त्यामुळे त्यांनी प्राथमिक शिक्षणानंतर शाळा सोडली. चंदेरी दुनियेची स्वप्नं त्यांना पडू लागली.

पद्मा यांचा जन्म ७ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. हवे ते भाव हवे तेव्हा प्रकट करणारा चेहरा, बोलके डोळे, आकर्षक व्यक्तिमत्व आणि भरीस भर म्हणजे अप्रतिम सौंदर्य या गोष्टींचे दान त्यांच्या पदरात जन्मापासूनच पडले होते. त्यांचे वडील कॅप्टन आण्णासाहेब चव्हाण पुरोगामी विचारांचे असल्याने त्यांनी कधी लेकीला विरोध केला नाही. १९५९ मध्ये त्यांना भालजी पेंढारकरांच्या ‘आकाशगंगा’ चित्रपटात काम करायची संधी मिळाली आणि मग मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

सिनेसृष्टीत आगमन झाल्यावर बिनधास्त अभिनय आणि दिलखेचक सौंदर्य ही त्यांची ओळख बनली. आचार्य अत्रे यांनी त्यांना त्यांच्या अभिनयामुळे ‘महाराष्ट्राची मर्लिन मनरो’ व ‘सौंदर्याचा ऍटम बॉम्ब’ हे किताब देऊ केले. अवघाचि संसार (१९६०), बिन बादल बरसात (१९६१), कश्मीर की कली (१९६४), आराम हराम आहे (१९७६), तूच माझी राणी (१९७७), बोट लावीन तिथं गुदगुल्या (१९७८), दोस्त असावा तर असा (१९७८), अष्टविनायक (१९७९), अशांती (१९८२), अंगूर (१९८२), नवरे सगळे गाढव (१९८२), सदमा (१९८३), प्रेमासाठी वाट्टेल ते (१९८७) यांसारख्या जवळपास ३० मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये पद्मा यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली आहे.

चित्रपटांबरोबरच रंगभूमीवरही त्यांच्या अभिनयाची जादू कायम राहिली. लग्नाची बेडी, माझी बायको माझी मेव्हणी, नवऱ्याची धमाल तर बायकोची कमाल, बीवी करी सलाम, गुंतता हृदय हे, बायकोला जेव्हा जाग येते, म्हणून मी तुला कुठे नेत नाही यांसारख्या नाटकांमधल्या त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. त्यांच्या अभिनय कारकिर्दीचे घोडे चौफेर उधळत होते. १९६६ साली त्यांनी दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Cinemaazi (@cinemaazi)

१९७५ साली ‘या सुखांनो या’ तर १९७६ साली ‘आराम हराम आहे’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी पद्मा चव्हाण यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले होते. त्या काळात पद्मा आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर होत्या. मात्र १२ सप्टेंबर १९९६ रोजी त्यांचा एका मोटार अ’प’घा’तात दुर्दैवी मृ’त्यू झाला.

You might also like