एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

दिशा पाटनीवरती फिदा झालाय हा भारतीय क्रिकेटर, म्हणतो इंग्लंडमध्ये तिच्यासोबत सुट्टीवर जायचंय..

बॉलिवूड सेलिब्रेटींनी भल्याभल्यांना वेड लावलं आहे. क्रिकेट आणि बॉलिवूड यांचे तर फार जुने नाते आहे. दोन्ही क्षेत्रातील व्यक्तींना सेलिब्रेटीसारखा मान मिळतो. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली, गीता बसरा आणि हरभजन सिंग, हेझल कीच आणि युवराज सिंग, सागरीका घाटगे आणि झहीर खान यांसारख्या कपल्सनी तर या दोन क्षेत्रांना अजून जवळ आणलं.

त्यामुळे एखाद्या क्रिकेटरचा बॉलिवूड अभिनेत्रीवर क्रश असणे नवीन नाही. टीम इंडियाचा एक नवीन क्रिकेटपटू आता एका बॉलिवूड अभिनेत्रीवर लटटू झाल्याची बातमी समोर येत आहे.

भारताचा युवा गोलंदाज अर्जान नगवास्वाला याचा सध्या एका बॉलिवूड अभिनेत्रीवर क्रश असल्याचे बोलले जाते. अर्जान भारतीय क्रिकेट संघाचा एक आघाडीचा गोलंदाज आहे. त्याला क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या विरुद्ध गोलंदाजी करायची इच्छा आहे. अर्जानचा जन्म १७ ऑक्टोबर १९९७ मध्ये गुजरात मध्ये झाला. या डावखुऱ्या जलदगती गोलंदाजाने २०१७-१८ च्या सत्रात बडोदा संघाविरुद्ध रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केलं. स्थानिक क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर त्याने हळूहळू सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

सध्या भारतीय क्रिकेट संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड विरुद्ध खेळत आहे. ४ ऑगस्ट पासून हे सामने सुरू झाले आहेत. त्याआधी भारतीय संघाला २४ जून ते १४ जुलै अशी २० दिवसांची सुट्टी देण्यात आली होती. त्यानंतर संघ कुटुंबियांसह बायो-बबल मध्ये दाखल होण्याचे संकेत होते. संघातील इतर खेळाडूंनी आपल्या कुटुंबियांसह ही सुट्टी घालवण्याचा बेत बनवला असताना गोलंदाज अर्जान नगवास्वाला याने मात्र त्याची बॉलिवूड क्रश दिशा पटानी सोबत इंग्लंडला सुट्टीसाठी जायला आवडेल असे सांगितले.

इंग्लंडच्या या दौऱ्यासाठी अर्जान नगवास्वालाला राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. जर त्याला इंग्लंड विरूद्ध प्लेइंग इलेव्हन मध्ये खेळवलं तर ४६ वर्षांनंतर प्रथमच एक पारसी खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. फारुख इंजिनीयर यांनी १९७५ साली भारताकडून अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. २३ वर्षीय अर्जान नगवास्वालाने आपल्या कामगिरीने निवड समिती सदस्यांना प्रभावित केलं आणि भारतीय संघात प्रवेश मिळवला.

अनेक सामन्यांमध्ये अप्रतिम कामगिरी करत अर्जानने क्रीडा रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कधीकाळी जर अर्जानची दिशा पटानी बरोबर सुट्टीवर जाण्याची इच्छा पूर्ण झालीच तर त्याच्यासारखा नशीबवान तोच! काय मंडळी, तुम्हालाही जायला आवडेल ना तुमच्या बॉलिवूड क्रश बरोबर सुट्टीवर जायला? तुमच्या बॉलिवूड क्रश बद्दल आम्हाला सांगायला विसरू नका.

You might also like