एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील या अभिनेत्रीने पुण्यात सुरू केला स्वतःचा व्यवसाय..

झी मराठी वाहिनीने आजपर्यंत अनेक सुप्रसिद्ध मालिकांचा खजिना प्रेक्षकांना दिला आहे. त्यामुळे मालिका संपली आणि कितीही जुनी झाली, तरी प्रेक्षक त्या मालिकेचे कथानक आणि मालिकेतील व्यक्तिरेखा या दोन्ही गोष्टी विसरू शकत नाहीत.

या व्यक्तिरेखा साकारणारे कलाकार प्रेक्षकांच्या अगदी घरचे होऊन गेलेले असतात. त्यामुळे बरेच दिवस उलटून गेले तरी या कलाकारांबद्दलचे कुतूहल कायम राहते. मालिका संपता संपता मालिकेतील अगदी छोट्यातली छोटी व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांच्या पक्की लक्षात राहिलेली असते.

अशीच एक गाजलेली मालिका होती ‘तुझ्यात जीव रंगला’. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मालिकेतील व्यक्तिरेखा आणि त्या साकारणारे कलाकार मात्र अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.

या मालिकेतील एका कलाकाराने नुकत्याच आपल्या नवीन व्यवसायाला सुरुवात केली आहे. ही कलाकार आहे दीप्ती सोनावणे. दीप्तीने ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत ‘चंदा’ ची भूमिका साकारली होती. वाहिनीसाहेबांच्या सतत पुढेमागे करणारं असं हे चंदाचं पात्र होतं. भूमिका छोटीशी असली तरी आपल्या विनोदी ढंगामुळे ती सगळ्यांच्याच लक्षात राहिली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dipti S Actress 🎥💕🎥 (@dips2455)

अलीकडेच ती ‘चला हवा येऊ द्या: शेलिब्रेटी पॅटर्न’ मधून प्रेक्षकांना आपल्या विनोदी अभिनयाने हसवताना दिसली होती. तिने आधी एका नाटकात देखील काम केले आहे. दीप्तीला अभिनयाबरोबरच नृत्याची देखील आवड आहे. हीच आवड आता तिने व्यवसायात बदलली आहे.

पुण्यात तिने आपला हा नवा व्यवसाय सुरू केला आहे. ‘दिप्स ऍक्टिंग अँड डान्स अकॅडमी’ असे तिच्या नव्या व्यवसायाचे नाव आहे. आपल्या या नव्या कामातून ती अनेकांना नृत्याचे तसेच अभिनयाचे धडे गिरवायला शिकवणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dipti S Actress 🎥💕🎥 (@dips2455)

आपल्या या अकॅडमी तर्फे ती अनेक विद्यार्थ्यांना नाटकात काम करण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे देताना त्यांना नवरस, मुकाभिनय, वाचिक अभिनय, कायिक अभिनय अशा अभिनयाच्या विविध प्रकारांतील बारकावे शिकवले जाणार आहेत. नृत्य शिकवताना नृत्यातील बारकाव्यांबरोबर बॉलिवूड, सालसा, झुम्बा असे नृत्यप्रकारही विद्यार्थ्यांना शिकता येणार आहेत. पुण्यातील पाषाण परिसरात तिची ही अकॅडमी असणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dipti S Actress 🎥💕🎥 (@dips2455)

अभिनेत्री दीप्ती सोनावणे ही पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर अभिजित सोनावणे यांची सख्खी बहीण आहे. पुण्यातील रस्त्यांवर किंवा मंदिरांजवळ जे लोक बेवारसपणे फिरत असतात, त्यांच्यावर डॉ. अभिजित सोनावणे मोफत उपचार करतात. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल अनेक प्रसार माध्यमांनी घेतली आहे.

You might also like