एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

रणवीरसह दीपिका हॉस्पिटलमध्ये! दीपिका देणार का गोड बातमी?

दीपवीर म्हणजेच बॉलिवूडमधील लाडकी जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण. आपल्या अभिनय कारकिर्दीव्यतिरिक्त विनोदी व्हिडिओज् मधून हे दोघे सतत सोशल मीडिया वर सक्रीय असतात.

या दोघांची जोडी खूपच लोकप्रिय आहे. बराच काळ एकमेकांना डे’ट केल्यानंतर नोव्हेंबर २०१८ मध्ये या दोघांनी इटली मध्ये डेस्टिनेशन वेडींग केले होते. दोघांच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीसुद्धा सोशल मीडिया वर व्हायरल होत असतात.

सध्या हे दोघे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. शनिवारी या दोघांना मुंबईमधील खारच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये जाताना बघितले गेले. लगेचच दोघांचे फोटो आणि या दोघांना हॉस्पिटलमध्ये जाताना बघितल्याची बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडिया वर पसरली.

या दोघांच्या हॉस्पिटल भेटीबद्दल अनेक अंदाज बांधले जात आहेत. चाहत्यांना मात्र एका वेगळ्याच गोष्टीची शंका येत आहे.

रणवीर आणि दीपिका ला हॉस्पिटल मध्ये गेलेलं बघून चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला आहे. लवकरच हे दोघे काहीतरी गोड बातमी देतील अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.

काही चाहते मात्र दोघांची तब्येत ठीक असू दे, अशी प्रार्थना करत आहेत. रणवीर आणि दीपिकाने मात्र याबाबत अजून काही स्टेटमेंट दिले नाहीये. मात्र चाहत्यांमध्ये आपल्या आपल्या अंदाजांबद्दल चर्चा सुरू आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

रणवीर सिंग चा नवीन चित्रपट ‘८३’ लवकरच प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. यामध्ये रणवीर बरोबर दीपिका पदुकोण देखील काम करत आहे. या चित्रपटाबरोबरच त्याच्याकडे जयेशभाई जोरदार, सर्कस, तख्त, रॉकी और रॉनी की प्रेम कहानी हे चित्रपट आहेत.

दीपिका देखील आपल्या प्रोजेक्ट्स मध्ये बिझी आहे. सध्या ती आपल्या ‘पठाण’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर शाहरुख खान आणि जॉन अब्राहम देखील असणार आहेत.

रणवीर आणि दीपिका ला लोक ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन देखील खूप पसंत करतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीबद्दल लोकांना कुतूहल असते. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. बाजीराव-मस्तानी, रामलीला हे त्यातले काही गाजलेले चित्रपट.

]या दोघांच्या सगळ्या चित्रपटांना प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात. तसेच त्यांचे ऑफस्क्रीन फोटोदेखील खूप व्हायरल होतात. दोघेही सतत काहीतरी विनोदी व्हिडिओ सोशल मीडिया वर शेअर करताना दिसतात.

काय मित्रहो, दीपवीर ची ही जोडी तुमचीही आवडती आहे ना? तुम्हाला या दोघांचे चित्रपट आवडत असतील तर आम्हाला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. आमचे लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

You might also like