एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

फोटोतल्या या चिमुरडीला ओळखले का? सध्या आहे बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री…

वाचकहो, ही फोटोमध्ये दिसते त्या चिमुरडीला तुम्ही ओळखू शकता का? ही आहे आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री दीपिका पदुकोण. दीपिकाने नुकताच आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर हा फोटो शेअर केला आणि या क्यूट छोकरीचा हा फोटो लागलीच व्हायरल झाला.

तसे या आधीही दीपिकाने आपले लहानपणीचे फोटो शेअर केले आहेत. पण दीपिकाने एखादा नवीन फोटो शेअर करताच तिच्या चाहत्यांना मात्र नेहमीच एक वेगळा आनंद मिळतो.

दीपिकाने आपल्या अभिनयाने सगळ्यांना मोहित करून टाकलं आहे. शाळेत बॅडमिंटन मध्ये करिअर करायचे म्हणून सराव करणारी दीपिका मॉडेलिंग कडे आकर्षित झाली. २००४ पासून तिने मॉडेलिंग सुरू केले. त्यानंतर तिने चित्रपटांमध्येही काम करण्यास सुरुवात केली. तुम्हाला माहीत आहे का, की दीपिका अभिनय क्षेत्रात येण्याआधी गायक हिमेश रेशमियाच्या ‘नाम है तेरा’ या गाण्याच्या व्हिडिओ मध्ये दिसली होती? दिग्दर्शिका फराह खानने तिला या व्हिडिओ मध्ये बघितली आणि तिला अभिनेत्री म्हणून चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला.

ओम शांती ओम (२००७), लव्ह आज कल (२००९), आरक्षण (२०११), कॉकटेल (२०१२), रेस २ (२०१३), ये जवानी है दिवानी (२०१३), चेन्नई एक्सप्रेस (२०१३), रामलीला (२०१३), पिकू (२०१५), बाजीराव मस्तानी (२०१५), पद्मावत (२०१८) यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत तिने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. २०१७ मध्ये तिने एका हॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे.

चित्रपटांच्या दरम्यान तिच्या आणि रणबीर कपूरच्या अफेयरच्या चर्चा होऊ लागल्या. मात्र दोघांचे ब्रेकअप झाले. २०१२ मध्ये रणवीर आणि दीपिकाच्या डेटींगच्या बातम्या येऊ लागल्या. दोघांनीही आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली. नोव्हेंबर २०१८ मध्ये दोघांनी इटली मध्ये लग्नगाठ बांधली.

२०१८ मध्ये तिने स्वतःची प्रॉडक्शन कंपनी ‘का प्रॉडक्शन’ सुरू केली. याच प्रॉडक्शन कंपनीच्या नावाखाली तिने तिचा ‘छपाक’ हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित केला. यातील तिच्या मध्यवर्ती भूमिकेचे खूप कौतुक झाले. याच प्रॉडक्शन हाऊसचा नवीन चित्रपट ‘८३’ हा आहे, ज्यात रणवीर सिंग क्रिकेटपटू कपिल देव ची भूमिका साकारणार आहे.

तसेच दीपिका ‘महाभारत’ या नवीन चित्रपटामध्ये ‘द्रौपदी’ ची भूमिका साकारणार आहे. ‘फायटर’ या चित्रपटात ती अभिनेता हृतिक रोशन बरोबर दिसेल. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होईल.

You might also like