एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

मुलगी झाली हो… या अभिनेत्रीला झाली कन्यारत्नाची प्राप्ती..

आई होणं ही आतून बाहेरून मोहरून टाकणारी आणि तितकीच जबाबदारीची भावना जागवणारी भूमिका आहे. स्त्री इतर वेळी कोणत्याही भूमिकेत असो, आईची भूमिका तिच्यासाठी नेहमीच खास असते. कोणत्याही स्त्री साठी आई होणं हे एखाद्या स्वप्नासारखंच असतं. मग ती स्त्री कोणत्याही क्षेत्रात काम करणारी असू दे. नुकतीच एका अभिनेत्रीने आपल्या बाळंतपणाची बातमी सोशल मीडिया वर शेअर केली आणि चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपश्री माळीने आपल्या डोहाळजेवणाचे फोटो सोशल मीडिया वर शेअर करत तिच्या चाहत्यांना ती आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती. नुकतीच तिने आपल्याला मुलगी झाली असल्याची गोड बातमी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dipashree🌸 (@dipashreedmali)

आपल्या मुलीबरोबरचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी तिने चाहत्यांना दिली. या फोटो मध्ये तिच्या नवजात मुलीने तिचे बोट पकडले आहे. या फोटोमध्ये या दोघींचे केवळ हात दिसत आहेत. मात्र फोटो बराच बोलका आहे. दीपश्रीला झालेला आनंद यातून दिसून येत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dipashree🌸 (@dipashreedmali)

या फोटोला तिने एक सुंदर कॅप्शन देखील दिली आहे. “एक नवीन स्पर्श, नवीन साथ कायमची, एक विश्वास निरंतर राहणारा, एक प्रवास एकत्रीत नवीन विश्व नवीन आयुष्य, आतून बाहेरून बदलुन टाकणारं आणि शेवटपर्यंत हक्काने सतत कानावर ऐकू येणारा निःशब्द करणारा एकच शब्द “आई “. काल आमच्या घरी लक्ष्मी आली मुलगी झाली हो Proud Mom.. Yesterday Blessed with Baby Girl” अशा शब्दांत तिने आपला आनंद व्यक्त केला आहे.

तिच्या या बातमीवर तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांबरोबरच अनेक सहकलाकारांनी देखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सुरुची आडारकर, सिद्धार्थ खिरीड, समिहा सुळे आणि इतर कलाकारांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

दीपश्री मराठी मालिकांमध्ये काम करते. साधारण चार वर्षांपूर्वी तिचे अमेय माळीबरोबर लग्न झाले होते. अभिनयाची पहिल्यापासूनच आवड असल्याने दीपश्रीने लग्नानंतर देखील आपली ही आवड जपली आहे.

आपला संसार सांभाळत मधल्या काळात तिने मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ‘गर्ल्स हॉस्टेल’ या मालिकेत तिने साकारलेली भूमिका सगळ्यांनाच आवडून गेली. झी युवा वाहिनीवर ही मालिका प्रसारीत होत होती. त्यानंतर तिने ‘एक घर मंतरलेलं’ या मालिकेतही भूमिका साकारली. विशेष म्हणजे ही मालिका देखील झी युवा वाहिनीवर प्रसारीत होत होती. या मालिकेत तिच्याबरोबर सुरुची आडारकर आणि सुयश टिळक प्रमुख भूमिकेत काम करत होते.

You might also like