एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

दिवसाकाठी ३६ रुपये कमवणारे दिलीप कुमार मृ’त्यूनंतर पाठीमागे सोडून गेले तब्बल एवढी संपत्ती..पहा

बॉलिवूडचे ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखले जाणारे दिलीप कुमार यांचे ७ जुलै २०२१ रोजी वयाच्या ९८ व्या वर्षी मुंबईच्या आहुजा रुग्णालयात नि-धन झाले. भारतासह त्यांचे जन्मस्थान पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश आणि परदेशातही त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या जाण्याबद्दल हळहळ व्यक्त केली.

फाळणीनंतर भारतात आल्यानंतर पुण्यात दिलीप कुमार यांनी आर्मी क्लबच्या सँडविच स्टॉलवर काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना रु. ३६ एवढा पगार मिळायचा. नंतर चित्रपटांमध्ये काम करायला लागल्यावर त्यांनी बराच पैसा आणि प्रसिद्धी मिळवली. १९४४ ला त्यांचा पहिला चित्रपट ‘ज्वार भाटा’ प्रदर्शित झाला. त्यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले.

त्याकाळी म्हणजे १९५० च्या काळात ते एका चित्रपटासाठी एक लाख रुपये घ्यायचे. ही किंमत त्याकाळी खूपच जास्त होती त्यामुळे ते सर्वाधिक मोबदला घेणारे कलाकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी एकूण ६२ चित्रपट केले. त्यांच्या शेवटच्या चित्रपटासाठी त्यांनी १२ लाख रुपये घेतले होते.

३६ रुपयांपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता करोडोंच्या प्रॉपर्टी वर येऊन थांबला आहे. दिलीप कुमार यांचा पाली हिल्स मधला बंगला एखाद्या महालापेक्षा कमी नाहीये. आता जवळपास ३५० करोड रुपये किंमत असलेला हा बंगला त्यांनी १९५३ मध्ये कमरुद्दीन लतीफ यांच्याकडून १.४ लाख रुपयांना खरेदी केला होता. २००० स्क्वेअर मीटर मध्ये पसरलेला हा प्रशस्त बंगला बाहेरून जेवढा देखणा आहे तेवढाच आतून देखील सुंदर आहे.

पांढऱ्या संगमरवरी फरश्या असलेला हा बंगला आपल्या इंटेरीयरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो. घरातले लाकडी फर्निचरही घराच्या मोठेपणाला शोभा आणणारं आहे. मोठ्या आणि आरामदायक बेडरूम्स हे या घराचे अजून एक वैशिष्ट्य. पाहुण्यांच्या स्वागतासाठी स्वतंत्र गेस्ट रूम देखील आहे. घराच्या डिझाईनला शोभेल अशी रंगसंगती उठून दिसते. हा बंगला बराच जुना असला तरी दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानू यांनी त्याचे वेळोवेळी नूतनीकरण करून घेतले आहे.

दिलीप कुमार यांचे मूळ नाव मोहम्मद युसूफ खान असून त्यांचा जन्म पाकिस्तानमधील पेशावर येथे झाला होता. तेथे त्यांचे १०० वर्षं जुने वडिलोपार्जित घर असून पाकिस्तान सरकारने २०१४ साली या घराला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केले. या चार मजली घराला त्यांच्या नावाच्या म्युझियम मध्ये रूपांतरित करण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला होता. या घराची किंमत त्यावेळी ८० लाख सांगण्यात आली होती.

You might also like