एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांनी घेतला जगाचा निरोप, वयाच्या ९८ वर्षी झाले नि’धन..

नमस्कार,
मित्रहो गेली दोन वर्षे परस्थिती पूर्णपणे बदलली आहे, सर्वत्र हाहाकार माजला असुन माणसाचे जगणे क्षणिक बनले आहे. या दोन वर्षात कित्येक लोकांच्या नि-धनाच्या वार्ता ऐकल्या आहेत. काहींचे नि-धन को-रोनामुळे झाले तर काहीजण अपघातात गेले आहेत. बॉलिवूड मधील काही कलाकार सुद्धा नि-धन पावले आहेत. इथे देखील खूपशा कलाकारांना को-रोना झाला होता, त्यातून काहीजण सुखरूप आले तर काहींनी प्राण सोडले. काहीजण आजारपणात असल्याने जीव सोडले. चंदेरी दुनियेतील अनेक तारकांची गणना कमी झाली आहे आणि आता त्यामध्ये दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे देखील नाव येते.

हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध, लोकप्रिय असणारे दिलीप कुमार यांनी बुधवारी सकाळी मुंबई मधील दवाखान्यात वयाच्या ९८ वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे बॉलिवूड मध्ये सर्वत्र शोककळा पसरली आहे, त्यांच्या नि-धनाने अनेकजण खूप दुःखी आहेत. आपल्या शोभिवंत आणि अतुलनीय अभिनय शैलीतून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. आजही त्यांचे चित्रपट पाहण्यास लोक नेहमीच उत्सुक असतात, त्यांचा उत्कृष्ट अभिनय आणि त्यांचे रेखीव सौंदर्य प्रेक्षकांना सहज भुलवते. त्यांचे चाहते अगदी जगभर पसरले आहेत.

हिंदी सिनेमा सृष्टीतील ट्रेजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे दिलीप कुमार बुधवारी सकाळी ठीक ७ : ३०वाजता नि-धन पावले, भरपूर दिवसापासून ते आजारी होते. त्यांना मागील एका महिन्यात दोन वेळा दवाखान्यात भरती केले होते. पण अखेर त्यांनी आपल्या जीवाला मुक्त केले, सायंकाळी पाच वाजता जुहू स्म-शानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. दिलीप कुमार हे खूप अनुभवी जुने कलाकार होते , त्यांच्या सोबत आता पूर्ण एक युग संपले आहे. भारताचे हे लोकप्रिय आणि उत्कृष्ट कलाकार गेले म्हणून अनेकांनी शोकांतिका केली आहे.

नरेंद्र मोदी प्रधानमंत्री , कांग्रेस नेता राहुल गांधी तसेच अन्य मुख्यमंत्री यांनी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली अर्पण केली असून शोक व्यक्त केला आहे. दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानो या वेळोवेळी त्यांच्या तब्येतीची माहिती देत होत्या, त्यांना खार हिंदुजा या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पाच जुलै रोजी सायरा बानो यांनी त्यांच्या तब्येतीबद्दल सांगितले होते की थोडी थोडी सुधारणा होत आहे, ते अजून दवाखान्यात आहेत. पण त्यांच्या हेल्थ अपडेट नंतर लगेच दोन दिवसानंतर दिलीप कुमार यांनी प्राण सोडले. त्यामुळे सर्वजण थक्क झाले आहेत.

दिलीप हे जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी ब्रिटिश इंडिया च्या पेशावर मध्ये जन्मले होते. त्यांचे खरे नाव मोहोम्मद युसुफ खान असे आहे, युसुफ खान यांची राज कपूर यांच्यासोबत लहानपणीच मैत्री झाली होती त्यामुळे बॉलिवूड मध्ये पाऊल टाकताना त्यांना जास्त अडचण आली न्हवती. जवळपास वयाच्या २२ वर्षी त्यांना चित्रपटात काम मिळाले होते. १९४४ मध्ये ज्वार भाटा या फिल्ममध्ये काम केले होते पण त्यांच्या या चित्रपटाची अधिक लोकप्रियता झाली न्हवती शिवाय त्याची कसलीच चर्चा सुद्धा झाली न्हवती. पुढे त्यांनी जे चित्रपट प्रदर्शित केले त्यातून त्यांची लोकप्रियता वाढत गेली, त्यांनी जवळपास पाच दशके चित्रपट सृष्टीत काम केले असून ६० च्या आसपास चित्रपट केले आहेत.

दिलीप कुमार हे खूप चांगले कलाकार होते आणि त्यांना त्यांच्या कलेला नेहमीच अर्थगर्भ ठेवायचे होते, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काही चित्रपटांना नाकारले सुद्धा होते. ते म्हणायचे की कमी चित्रपट करायचे पण उत्तम चित्रपट करायचे. त्यामुळे त्यांचे सर्व चित्रपट उत्कृष्ट आहेत, रसिकांना प्रत्येक वेळी काही तरी नवीन शिकवून जाणारे आहेत. पण त्यांना प्यासा आणि दिवार मध्ये काम न केल्याची नेहमीच खंत वाटत राहिली होती. त्यांचे इतर चित्रपट आणि त्यातील त्यांचा अभिनय अप्रतिम आहे म्हणून तर आजही लोक आवडीने चित्रपट पाहतात.

दिलीप कुमार यांनी १९६६ मध्ये सायरा बानो यांच्याशी लग्न केले होते ज्या स्वतः बॉलिवूड मधील एक उत्कृष्ट अभिनेत्री होत्या. जेव्हा त्यांचे लग्न झाले होते तेव्हा सायरा बानो या दिलीप कुमार यांच्यापेक्षा तब्बल २२ वर्षांनी लहान होत्या. दिलीप कुमार यांनी आसमा सायबा सोबत देखील लग्न केले होते पण त्यांचे हे लग्न फक्त १९८३ पर्यंत टिकले होते. पण सायरा बानो यांनी मात्र दिलीप कुमार यांची साथ आयुष्यभर नाही सोडली अगदी अंतिम क्षणापर्यंत सायरा बानो दिलीप कुमार सोबत होत्या, त्यांनी त्यांची सेवा सुद्धा केली आहे. खूप काळजी घेतली आहे. त्यांच्या तब्येतीची वरचेवर सर्व कल्पना त्यांच्या चाहत्यांना देत होत्या.

दिलीप कुमार यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे, त्यांचे सर्व चित्रपट उत्कृष्ट दर्जाचे आहेत. त्यांनी मेला , शहीद , नदिया के पार , बाबूल , फुटपाथ , देवदास, नया दौर , मुघल-ए-आजम, गंगा जमुना, राम और शाम ,करमा या व अशा अनेक हिंदी सिनेमात ते झळकले आहेत. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट किला हा त्यांचा अखेरचा होता. त्यानंतर ते पडद्यावर दिसले नाहीत. पण त्यांचे हे सर्व चित्रपट लोकप्रिय झाले आहेत, त्यांना बॉलिवूड मध्ये एक विशेष ओळख मिळाली आहे.

दिलीप कुमार यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयातून अनेक पुरस्कार जिंकले आहेत , पद्मभूषण , दादासाहेब फाळके पुरस्कार , पद्मविभूषण या पुरस्कारांनी त्यांना भारत सरकारने सन्मानित केले आहे. तसेच पाकिस्तान ने देखील दिलीप कुमार यांना सर्वोच्च नागरिक हा पुरस्कार प्रदान केला होता. २००० ते २००६ पर्यंत दिलीप कुमार राज्यसभा संसद मध्ये होते. दिलीप कुमार यांनी अनेकांची मने जिंकली आहेत, ते आता जरी आपल्या सोबत नसले तरीही त्यांनी साकारलेल्या मनोरम भूमिकेतून ते सदैव रसिकांच्या हृदयात जिवंत राहतील. पुन्हा एकदा आमच्या कडून दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!!

You might also like